राज्यात सध्या हवामानामध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. राज्याच्या काही भागात थंडी तर काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे देशात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार (IMD), दक्षिणपूर्व बंगाल उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात 14 नोव्हेंबरपासून पावसाचा नवा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आठवड्याभरात दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल (मंगळवारी) दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती.
हवामान विभागाच्या माहितीनुसार कमी दाबाचा पट्टा पश्चिम-वायव्येकडे सरकले जाईल आणि गुरुवारपर्यंत बंगालच्या उपसागरावर दबाव वाढेल. त्यामुळे अवकाळी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अंदमान आणि निकोबार बेटे, अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागराच्या लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे पश्चिम बंगालच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.