मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा

काळजी घ्या ! पुढील काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता
Temperature
Temperature
Updated on

पुणे : पुढील तीन दिवसांमध्ये पश्चिम हिमालयीन क्षेत्र आणि गुजरात राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच पुढील तीन-चार दिवसांमध्ये पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ (Vidarbha) आणि राजस्थानमध्ये आणि २९-३१ मार्च दरम्यान दक्षिण पंजाब, दक्षिण हरियाणा, बिहार, झारखंड, उत्तर-मध्य आणि मराठवाड्यात (Marathwada) उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शकता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Weater Department) आज रविवारी (ता.२७) वर्तवला आहे. राज्यात उन्हाळ्यामध्ये नागरिकांना निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव आला आहे. भर उन्हात कधी ढगाळ वातावरण, कधी अवकाळी पाऊस पडला आहे. मात्र मार्चच्या शेवटी राज्यातील नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होणार आहे. (Weather Update Last Three Days Heat Wave Hit Maharashtra)

Temperature
वातावरणातील उष्णता वाढू लागताच कलिंगड, खरबुजाची आवक वाढली

विदर्भ आणि मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आणि उष्ण प्रदेशामध्ये वारा वाहन्यातील खंडनामुळे राज्यात मार्चच्या अखेरीला उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता हवामानाच्या अभ्यासकांनी वर्तवला आहे. हवामान विभागाने ८, ९ आणि १० मार्चला राज्यातील काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार कोल्हापूरसह काही भागात पाऊस झाला. दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे.

Temperature
मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांत येणार उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा

अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे काय होईल याची चिंता शेतकऱ्यांना होता. मात्र नुसते ढगाळ वातावरण राहिल्याने शेतकऱ्यांवरील अवकाळी संकट टळले आहे. सध्या रब्बी पिकांची काढणीचे कामे सुरु आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()