Weather Update : राज्यात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात; पिकांचे नुकसान, वीज पडून पाच जणांचा मृत्यू

अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान
weather update maharashtra pre-monsoon rains Damage to crops death of five people due to lightning
weather update maharashtra pre-monsoon rains Damage to crops death of five people due to lightningesakal
Updated on

नाशिक/बुलडाणा/सोलापूर : राज्यात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली असून आज दुपारनंतर विविध जिल्ह्यांमध्ये आकाशात काळ्या ढगांची दाटी होऊन मेघगर्जना आणि विजांसह पाऊस कोसळला. पावसापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी धुळीचे लोट उसळले होते. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली.

वादळामुळे केळी, पपईच्या बागा भुईसपाट झाल्या असून, उन्हाळी पिके देखील आडवी झाली आहेत. राज्यात आज नाशिक, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, हिंगोली, वाशिम, जालना, सोलापूर, पुणे, नगर, सांगली, पालघर या जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली.

नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीने दाणादाण उडाली. वादळी वाऱ्याने अधिक फटका बसला, तर पावसाचा जोर तुलनेत कमी होता. पावसामुळे साठवलेला कांदा भिजला, शेवगा व पपई लागवडी आडव्या झाल्या.

weather update maharashtra pre-monsoon rains Damage to crops death of five people due to lightning
Weather Update: मान्सून केरळमध्ये उद्या दाखल होणार तर राज्यात...

भाजीपाला पिके, घरे व झाडांचे नुकसान झाले आहे. कैऱ्या गळून पडल्या. सिन्नर तालुक्यातील विंचूरी दळवी परिसरात १५ मिनिटे जोरदार गारपीट झाली. नगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, राहता, संगमनेर, अकोले परिसरात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला.

कोपरगाव तालुक्यात येसगाव टाकळी फाटा भागात वादळाचा तडाखा बसला आहे. शेवगाव तालुक्यातील वादळामुळे झाडे उन्मळून पडली. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात रविवारी दुपारी अनेक घरावरील पत्रे उडून गेले.

झाडे उन्मळून पडली. तर काही ठिकाणी पाऊसही झाला. पुणे जिल्ह्यातील हवेली, मुळशी, मावळ, खेड, भोर, पुरंदर, बारामती भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या.

weather update maharashtra pre-monsoon rains Damage to crops death of five people due to lightning
Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मॉन्सूनने व्यापला अंदमान-निकोबार बेटसमूह

सोलापूरमध्ये अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला. वाऱ्यांमुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले. पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे भुईमूग, आंबे, केळी आणि नारळाचे नुकसान झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातही वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्यामुळे वाहतूक विस्कळित झाली.

...अशी आहे नुकसान स्थिती

- खानदेशात वादळी पावसाने नुकसान

- जळगाव जिल्ह्यात वादळ व हलकी गारपीट

- धुळ्यात वादळामुळे हानी

- नाशिकमध्ये पाऊस, गारपिटीने दाणादाण

- सोलापूरमध्ये झाडे आणि वीजेचे खांब कोसळले

- रत्नागिरीतही हजेरी

नंदुरबारला चक्रीवादळाचा तडाखा

गुजरातमधून घोंगावत आलेल्या चक्रीवादळाचा नंदुरबार जिल्ह्याला रविवारी जोरदार तडाखा बसला. या वादळामुळे घरे, शाळा आणि झोपड्यावरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले असून विजेचे खांबही वाकले आहेत.

केळीच्या बागेतील खोड आडवे झाले असून काढलेली केळीही पावसात सापडल्याने शहादा तालुक्याती मोठी हानी झाली आहे. या चक्रीवादळात प्रतापपूर (ता. तळोदा) येथे धावत्या करावर वडाचे झाड कोसळून एक जण ठार तर दुसरा जखमी झाला आहे. दुसऱ्या एका घटनेत तीस मेढ्यांचाही मृत्यू झाला आहे. नंदुरबार शहरात काही ठिकाणी वीजतारा घासल्याने आगीच्या घटना घडल्या.

वीज पडून पाच जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी परिसरात शेतीत काम करणाऱ्या दोघांच्या अंगावर वीज पडून एक जण मृत्यूमुखी पडला. वाशिम जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मालेगांव तालुक्यात मुसळवाडी येथे वीज पडल्याने नारायण कदम (वय ४०) यांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणी वीज कोसळून दोन गायी, एक म्हैस आणि एक बैल यांचा मृत्यू झाला. सोलापूर शहर व जिल्ह्यात संध्याकाळी पावसाला अचानक सुरुवात झाली. करमाळा तालुक्यात गुळसळी येथे एका महिलेचा आणि सांगोल्यात एकाचा वीज पडून मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका शेतकऱ्याच्या अंगावर वृक्ष पडून जागीच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.