Weather Update: राज्याच्या पावसाची हजेरी; कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट
Weather Update
Weather UpdateEsakal
Updated on

राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे, तर काही भांगामध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. पुणे, मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण परिसरात चांगलाच पाऊस आहे. तर अद्याप काही भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट दिला आहे. (Latest Marathi News)

तर पुढील 4 दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील 4 दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)

Weather Update
Rain Update : पुणे, मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाची हजेरी; 2 जिल्ह्यांत हवामान विभागाकडून अलर्ट

पुणे आणि ठाण्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत आज पावसाचा जोर काहीसा कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर 5 जुलैपासून पुढील 3 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर कालपासून पुण्यात पावसाचा जोर ओसरला आहे. तर पुण्यातही पुढील 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.(Latest Marathi News)

Weather Update
Mumbai Rain Update : आजही पाऊस झोडपणार! मुंबई, ठाण्यासह पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

तर मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. तर पावसाचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. सध्या सुरु असलेल्या या पावसामुळे मुंबईच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण क्षेत्राच चांगला पाऊस पडत असल्यामुळे धरणांच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत आहे. (Marathi Tajya Batmya)

Weather Update
Weather Update: राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.