राज्यात पावसाची संततधार कायम

सर्वदूर मॉन्सून सरी, विदर्भात पूरस्थिती बिकट, मदत-बचाव कार्याला वेग
Weather update rain forcast continuous rainfall in maharashtra flood management Ndrf team monsoon mumbai
Weather update rain forcast continuous rainfall in maharashtra flood management Ndrf team monsoon mumbaisakal
Updated on

मुंबई : राज्यामध्ये संततधार कायम असून अनेक ठिकाणांवर पूरस्थिती बिकट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख धरणे भरली असून त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी काठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. विदर्भामध्ये पावसाचा जोर कायम असून गडचिरोली आणि अकोल्यामध्ये पूरस्थिती बिकट झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातल्या नांदा गोमुख गावाजवळ नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात लग्नाला आलेले स्कार्पिओमधील वऱ्हाड वाहून गेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या गाडीमध्ये आठ प्रवासी होते त्यातील एकूण तिघाजणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. विदर्भामध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याने स्थानिक यंत्रणा सावध झाल्या आहेत. मराठवाड्यामध्येही सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळतो आहे.

पावसाचा जोर वाढला

  • मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालन्यात संततधार

  • नांदेड जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना बुधवारी सुटी

  • नागपूरसह संपूर्ण विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

  • अकोल्यामध्ये दोन भावंडांना नदीमध्ये बुडताना वाचविले

  • गडचिरोलीमध्ये पूरस्थिती कायम, अहेरीतून अनेकांची सुटका

  • नाशिकमध्ये पाऊस थांबला पण गोदावरीचा पूर मात्र कायम

  • सातपुरा घाटात दरड कोसळली, नाशिक- सुरत मार्ग बंद

  • धुळ्याहून राज्य राखीव पोलिस दलाचे पथक नाशिकमध्ये

  • गंगापूरसह नऊ धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग

  • मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक विस्कळित

  • साताऱ्यामध्ये कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला

  • पुण्यातील चाकण परिसरामध्ये तीन मुलांचा खड्ड्यात पडून मृत्यू

  • पालघर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती बिकट, एनडीआरएफची पथके तैनात

  • सांगली जिल्ह्यात शिराळ्यात मुसळधार पाऊस, ओढे, नाले भरले

  • कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नरसोबावाडी येथे दक्षिणद्वार सोहळा उत्साहात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.