Unseasonal Rain: विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस; पुढील काही तासांमध्ये 'या' जिल्ह्यात पावसासह गारपीटीचा अंदाज

Weather Update Today: राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भ मराठवाड्यासह काही जिल्ह्यांमध्ये काल(सोमवारी) पावसाने हजेरी लावली. तर, काही ठिकाणी गारपीटही झाली
Unseasonal Rain
Unseasonal RainEsakal
Updated on

Maharashtra Weather Update: राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भ मराठवाड्यासह काही जिल्ह्यांमध्ये काल(सोमवारी) पावसाने हजेरी लावली. तर, काही ठिकाणी गारपीटही झाली. बुलढाणा, जळगाव आणि मनमाड याठिकाणी गारपीट झाली आहे. आजही मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान पुढील दोन ते तीन तासांमध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशीम, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी गारपीटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गेल्या २ तासांत नाशिक, जळगाव, बुलढाणा जिल्ह्यांत काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाची नोंद झाली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज आणि उद्या (मंगळवारी आणि बुधवारी) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचदरम्यान काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.

Unseasonal Rain
Marathi Bhasha Din : इंग्रज पोलिसांनी कुसुमाग्रजांच्या कार्यालयात धाड का टाकली होती ? काय होतं त्यांचं खरं नाव

कोणत्या जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता?

आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, मंगळवार २७ आणि बुधवार २८ फेब्रुवारी रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.

याशिवाय विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.

Unseasonal Rain
महाराष्ट्रात दररोज ८ शेतकरी संपवितात जीवन! २०२०-२१च्या तुलनेत आत्महत्यांमध्ये वाढ; ४ वर्षांत ११ हजार ८४ आत्महत्या; दुष्काळाची मदत अजूनही नाहीच

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि कन्नड तालुक्यात तुफान गारपीट झाली आहे. याशिवाय अकोला जिल्ह्यातील बाळापुर तेल्हारा आणि अकोट तालुक्यात, जालन्यात जाफराबाद तालुक्यात आणि बुलढाणा जिल्ह्यासह परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.