Weather Update: कडाक्याच्या थंडीसोबत आता अवकाळी पावसाचीही शक्यता! वाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Update: दिल्लीसह संपुर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. तर वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दोन ते तीन दिवसांत काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Weather Update
Weather UpdateEsakal
Updated on

दिल्लीसह संपुर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. नागरीकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. त्याचबरोबर सर्वत्र दाट धुक्यांची चादर पसरली आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. दाट धुक्याबरोबरच कडाक्याच्या थंडीची लाट देखील सुरूच आहे. दरम्यान, हवामान विभागाने, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 25 ते 28 जानेवारीपर्यंत हिमालयालगतच्या भागात हलकी बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाने, दोन ते तीन दिवसांत छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये दाट धुके आणि थंडीची लाट येण्याचा इशारा दिला आहे.

Weather Update
Weather App News: पुण्यातील १३ वर्षीय विद्यार्थ्याने तयार केले हवामान ॲप; देशातील प्रत्येक गाव, अन् शहराचे तपासता येणार हवामान

मात्र, किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होणार आहे, ही दिलासादायक बाब आहे. आज (गुरुवारी) सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अहवालात पुढील काही दिवस दाट धुके राहण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 28 तारखेच्या सकाळपर्यंत पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात दाट धुके राहू शकते. 28 जानेवारीपर्यंत दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. बिहारच्या विविध भागात २८ जानेवारीपर्यंत थंडीची लाट कायम आहे.

Weather Update
Sakal Podcast : INDIA आघाडीत बिघाडी? ममताजींचा 'एकला चलो रे'चा नारा ते Amazon ला 290 कोटी रुपयांचा दंड काय आहे कारण?

स्कायमेटच्या हवामान अहवालानुसार, पश्चिम हिमालयात हलका पाऊस आणि हिमवृष्टीसह काही मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, दक्षिण झारखंड, ओडिशाचा काही भाग, छत्तीसगड आणि विदर्भ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीवर १२ ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 26 जानेवारीपासून पावसाचा जोर वाढू शकतो आणि 26 ते 28 जानेवारी दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Weather Update
Nashik Crime : ISIS ला नाशिकमधून फंडिंग! संशयित ATS च्या ताब्यात; 7 दिवसांची पोलिस कोठडी

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही ठिकाणी दाट ते दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागात धुके पडू शकते. 25 जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये थंड दिवसापासून गंभीर थंड दिवसाची स्थिती निर्माण होऊ शकते. 26 ते 28 जानेवारी दरम्यान या राज्यांमध्ये थंडीची तीव्रता कमी होईल.

महाराष्ट्रात काय परिस्थिती?

वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत मराठवाडा, विदर्भ मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाची शक्यता आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.