Rain Updates : कोल्हापूरात पंचगंगेचं पात्र विस्तारलं, NDRFचे जवान सज्ज

महाराष्ट्रातील पावसाचे ताजे अपडेट्स जाणून घ्या फक्त ई-सकाळवर...
Panchaganga River
Panchaganga RiverSakal
Updated on

नंदूरबार जिल्ह्यातील नवापूरात पुन्हा पावसाचा जोर वाढला; सूरत-नागपूर महामार्गावरील रस्ता बंद

राज्यभर पावसाचं थैमान

  • नांदेडमधील ३४ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.

  • तर मराठवाड्यातील जायकवाडी धरण ५२ टक्के भरलं आहे.

  • अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

  • पुण्यातील खडकवासला धरण पूर्ण भरलं

  • कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीला पूर आला असून पूराच्या पाण्यामुळे नदीचं पात्र विस्तारलं आहे. त्याचबरोबर नदीपात्रात एनडीआरएफच्या टीम गस्त घालत असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Monsoon 2022 Weather Updates : राज्यात पावसाचा जोर वाढताच आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरुय. त्यामुळं काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. तर, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावलीय. मुसळधार पावसामुळं नद्यांच्या पाणीपातळीत वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. गुजरात कर्नाटकामध्ये देखील पावसानं मोठं नुकसान केलंय. महाराष्ट्र तसंच देशातील पावसाचे ताजे अपडेट्स जाणून घ्या फक्त ई-सकाळवर...

डोंबिवली : खोणी तळोजा महामार्गाच्या कडेला असलेल्या चिरड गावच्या पूलाचा काही भाग खचल्याची घटना गुरुवारी घडली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या पूलाची पहाणी केली असून या पुलावरून अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षी पावसाळ्यात या पूलाचे कठडे कोसळण्याची घटना घडली होता. यावर्षी पूलाचा काही भागच खचला असून पूलाला भगदाड पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पूलाची लवकरात लवकर डागडुजी करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्ग सुरळीत झाला असून मांडवी, खेड स्थानकातून रेल्वे गाड्या मुंबईतसाठी रवाना झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण ते अंजनीच्या दरम्यान रुळावर माती आल्यामुळे गाड्यांचे वेळापत्रकावर परिणाम झाला होता. मात्र आता गाड्या सुरळीत सुरु झाल्या आहेत.

मुंबई - पाच कल्याण आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. धुंवाधार पावसामध्येच कल्याण पूर्वेकडील कचोरे हनुमान नगर परिसरात असलेल्या टेकडीवरून काही दगड निसटल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने या टेकडी लगत लोखंडाची रेलिंग करण्यात आली आहे. दुर्घटना या दुर्घटनेत सुदैवाने कोणताही जीवितहानी झाली नाही. नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.

रत्नागिरी - मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण ते अंजनीच्या दरम्यान रुळावर माती आल्यामुळे गाड्यांचे वेळापत्रकावर परिणाम झाला. मांडवीसह मुंबईकडे जाणारी एक अशा दोन रेल्वे गाड्या दोन तास स्थानकातच थांबून होत्या. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. हा प्रकार दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडला. गेले आठ दिवस चिपळूण, खेड परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे वाशिष्ठी, जगबुडी नद्यांसह उपनद्या, वहाळ भरुन वाहत आहेत. डोंगरातील झरे वेगाने प्रवाहीत झाले असून त्या पाण्याबरोबर मातीही वाहून येत आहे.

चंद्रपुरातील इराई धरणाचे दरवाजे उघडले; वस्त्या जलमय

चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली. यामुळे इराई धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. धरणाचे दरवाजे उघडल्याने चंद्रपूर शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत.

दुमजली इमारत कोसळली; कोणतीही जीवित हानी नाही

सततच्या पावसाने अमरावतीत दूध डेअरी आणि इलेक्ट्रिकचे दुकान जमीनदोस्त झाले. दोन मजली इमारत कोसळी. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

देशातील अनेक राज्यात पावसाची धुंंवाधार बॅटिंग सुरु आहे. दरम्यान, गुजरातमध्ये मुसळधार पाऊस कायम आहे. त्यामुळे गुजरात वलसाड जिल्ह्यातील दमण गंगा नदीवरील मधुबन धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नागरिाकांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे.

अकोल्यात संततधार पावसाने नद्यांना पूर

अकोला - मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदी-नाले दुधढी भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक बाळापूर तालुक्यातील अनेक गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. अमरावती जिल्ह्यातील पूर्णा नदी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्याने अकोला जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या पात्रातही वाढ झाली आहे. जिल्‍ह्यातील सर्वच तालुक्यातील नदी-नाल्यांची पातळी वाढली आहे. विशेषतः बाळापूर तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून पूर्णा नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ सुरु आहे.

विशाळगडावरील लोखंडी जिन्याच्या बाजूचा बुरुज कोसळला

विशाळगडावर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी जिन्याच्या बाजूची दगडी बुरुज कोसळला आहे. त्यामुळे लोखंडी जिन्यावरून ये-जा बंद करण्यात आली आहे. पर्यायी रोडने लोकांची गडावर वर्दळ सुरू असल्याची माहिती शाहुवाडी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी दिली आहे.

औरंगाबाद : वेरूळ लेणीतील सीतान आणि धबधबा प्रवाहित

औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील सीतान आणि धबधबा प्रवाहित झाला आहे. जिल्ह्यात जोरात पाऊस झाल्यामुळं या धबधब्याला पाणी आलेलं आहे, त्यामुळं वेरूळ लेणीच्या सौंदर्यात भर पडली आहे. तब्बल 200 फूट उंचावरून सीता नानीचा धबधबा कोसळू लागला आहे.

दमण गंगा नदीवरील मधुबन धरणातून सोडलं पाणी

गुजरात : वलसाड जिल्ह्यातील दमण गंगा नदीवरील मधुबन धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं आहे.

गुजरात : नवसारी जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा, कावेरी आणि अंबिका या तीन नद्या पूरस्थितीत आहेत. काल रात्री पूर्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडलीय. लगतच्या भागात 40,000 लोक बाधित तर 2500 लोकांना सुरक्षित मदत छावण्यांमध्ये हलवलं आहे : नवसारी डीएम अमित प्रकाश यादव

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात मुसळधार पाऊस

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळं मोडकसागर धरणातून 224.03 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.

पाटबंधारे विभाग सांगली

पाणी पातळी (फूट-इंचामध्ये)

(धोका पातळी/आताची पातळी)

1) कृष्णा पूल कराड - (55.0)/12'5"

2) भिलवडी पूल - (53 ) /21'6"

3) आयर्विन- (45)/19'3"

4) राजापूर बंधारा -(58)/35'9"

कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ

पाटण : कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कराडच्या प्रीतिसंगमावर नदीची पाणी पातळी वाढली आहे. सध्या धरणातून काही प्रमाणात विसर्ग सुरु आहे.

पुण्यात वाड्याची भिंत कोसळली, 11 जणांची सुटका

पुणे : कोंढवा बुद्रुक गावठाणात एका वाड्याची भिंत गुरुवारी सकाळी शेजारील घरांवर कोसळली. सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोचून तीन घरांमधील 11 जणांची सुटका केली.

अणुस्कुरा घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद

कोल्हापूर : अणुस्कुरा घाटात दरड कोसळली असून वाहतूक बंद झालीय. सध्या घाटात जेसीबीच्या साहाय्यानं रस्त्यामधील दगडं हटवली जात आहेत. दरम्यान, अणुस्कुरा घाटात एकेरी वाहतूक‌‌‌ सुरू करण्यात आली आहे.

पंचगंगा पाणी पातळी - 36 फूट 10 इंच ( इशारा पातळी - 39 फूट व धोका पातळी - 43 फूट) एकूण पाण्याखालील बंधारे 58

कर्नाटकातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी

आज हवामान खात्यानं उत्तर गोवा, दक्षिण गोव्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तसंच कर्नाटकातील काही जिल्ह्यांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. तेथील उत्तरा कन्नड, उडुपी, शिमोगा, दक्षिण कन्नड, चिकमंगलूर आणि कोडागु जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

कर्नाटकात पावसामुळं 32 जणांचा मृत्यू

कर्नाटकात पाऊस आणि पुरामुळं आतापर्यंत 32 जणांना जीव गमवावा लागलाय. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लोकांच्या मदतीसाठी तातडीनं 500 कोटी रुपये जारी केले आहेत. पूरग्रस्त भागातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. गुरुवारीही राज्याच्या मोठ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय.

महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आजही पाऊस सुरुच राहणार आहे. बुधवारी मुसळधार पावसामुळं नाशिकमधील अनेक भागात पाणी साचलं होतं. दरम्यान, आज नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

मध्य प्रदेशमध्येही ऑरेंज अलर्ट

मध्य प्रदेशातील धार, देवास, सीहोर, रायसेन, होशंगाबाद जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासोबतच शेजारच्या छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव, बालोद, कांकेर, नारायणपूर, विजापूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

तेलंगणामध्ये शाळांना सुट्टी जाहीर

तेलंगणा : सततचा मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सर्व शैक्षणिक संस्थांना 14 जुलै ते 16 जुलैपर्यंत सुट्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय. 18 जुलै, सोमवारपासून शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू होतील.

हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता

हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. त्याचवेळी उत्तराखंडच्या विविध भागात 14, 16 आणि 17 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. सध्या पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात आज आणि उद्या मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलीय.

पालघर : वैतरणा नदीतून दहा कामगारांची सुटका

महाराष्ट्र : पालघरमधील वैतरणा नदीत दहा कामगार अडकले होते. त्यांची एनडीआरएफच्या पथकानं यशस्वीरित्या सुटका केलीय.

पालघर जिल्हा पावसाची तालुका निहाय अहवाल : दिनांक 14/07/2022 (8 am to 8pm) 1)वसई:- 80मी मी 2) जव्हार:- 237.66मी मी 3) विक्रमगड:- 296.50मी मी 4) मोखाडा:- 154.50मी मी 5) वाडा :- 267.75मी मी 6) डहाणू :- 232.66मी मी 7) पालघर:- 220मी मी 8) तलासरी :- 290.15मी मी एकूण पाऊस :- 1779.22मी मी एकुण सरासरी :- 222.40 मी मी

भंडारा : एसडीआरएफच्या पथकाकडून 15 जणांची सुटका

महाराष्ट्र : भंडारा जिल्ह्यातील तुमसर इथं एसडीआरएफच्या पथकानं आज 15 जणांची सुटका केली. पूरसदृश परिस्थितीमुळं ते एका मंदिरात अडकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.