राज्यभरात जोरदार पाऊस; नागपूरमध्ये सहा जणांचा मृत्यू

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
Maharashtra Rain Updates | Rain in Maharashtra
Maharashtra Rain Updates | Rain in Maharashtra sakal
Updated on

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ‘एनडीआरएफ’च्या १३ आणि ‘एसडीआरएफ’ची दोन पथके तैनात आहेत. तसेच गेल्या १२ दिवसांत अतिवृष्टीमुळे राज्यात ८४ नागरिकांचा तर १८० जनावरांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी ब्राह्मणमारी नदीत जीप वाहून गेल्याने सहा जणांचा मृत्यू झाला तर नाशिकमध्येही एक मुलगी वाहून गेली. (Maharashtra Rain Updates)

नाशिकला रेड अलर्ट

नाशिक : वरुणराजाने मंगळवारी सकाळपासून काहीशी उसंत घेतली आहे. मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे गंगापूरसह नऊ धरणांमधून विसर्ग सुरु आहे. गोदावरी नदीला आलेला पूर कायम राहिला आहे. पुरात त्र्यंबकेश्‍वर, सुरगाणा, दिंडोरी, पेठ नाशिक तालुक्यात पाच जण वाहून गेले. यात एकाचा मृत्यू झाला असून चार जणांचा प्रशासनाकडून शोध सुरु आहे. जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम २४ धरणांमध्ये आतापर्यंत ६३ टक्के जलसाठा झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात २७ टक्के जलसाठा होता. (Nashik Rain Updates)

आलमट्टीतून विसर्ग

मांजरी (जि.सांगली)ः कोकण, महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आलमट्टी धरणातून मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग तब्बल ७५ हजारांवरून १ लाख क्युसेक केला आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी आज तीन फुटांनी वाढली आहे.

मराठवाड्यात संततधार

औरंगाबाद ः मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत मंगळवारी संततधार होती. औरंगाबाद, नांदेड , उस्मानाबाद लातूर जिल्ह्यांत आज पावसाने सर्वदूर हजेरी लावली. हिंगोलीत सलग पाचव्या दिवशी सूर्यदर्शन झाले नाही. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून आतापर्यंत १८१.० मिलिमीटर नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यातील रेणा नदीला पूर आल्याने वाहतूक काही काळ खोळंबली होती. उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सहा जणांना जलसमाधी

नांदागोमुख (जि.नागपूर)ः मुसळधार पावसामुळे पुलावर पाणी वाहत असताना वाहनचालकाच्या आतातायीपणामुळे ब्राह्मणमारी नदीत जीप वाहून गेली. यात सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांसह दहा वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. ही घटना नांदागोमुख जवळील मंगळवारी दुपारी घडली. वाहून गेलेल्या व्यक्ती मध्य प्रदेशमधील मुलताई जवळ गावातील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.