Monsoon Update : मान्सून आला रे…! पुढील पाच दिवस छत्रीशिवाय बाहेर पडू नका

Maharashtra Monsoon Update
Maharashtra Monsoon Update
Updated on

बऱ्याच दिवसांपासून पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी समोर आली आहे. वाढलेल्या उकाड्यापासून दिलास देत विदर्भातील काही भागात मान्सून दाखल झाला आहे. विदर्भात मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाट होती. आता या मान्सूनच्या आगमनामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

विदर्भात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. दरम्यान विदर्भात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पूर्व विदर्भात पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Monsoon Update
ED Raid in Sangli : सांगलीत बड्या व्यापाऱ्यांच्या घरावर ईडीचे छापे! परिसरात खळबळ

मुंबईत कधी?

मान्सूनने विदर्भासह कर्नाटक, तेलंगना , छत्तीसगढ, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील काही भागात मान्सून पोहचला आहे. एकूणच मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. सोबतच गडचिरोली आणि चंद्रपूरचा भाग देखील काही भाग देखील मान्सूनने व्यापला आहे. पुढील ४८ तासांमध्ये विरर्भातील काही भाग, मराठवाडा आणि मध्यमाहाराष्ट्रात देकील मान्सूची प्रगती पाहायला मिळेल. यासोबतच ४८ तासत मान्सून मुंबईत देखील दाखल होईल.

Maharashtra Monsoon Update
Sanjeev Jaiswal : १५ कोटींची एफडी अन् मढ आयलंडला अर्धा एकरचा भूखंड! ईडीच्या छाप्यात IAS अधिकाऱ्याकडे सापडलं मोठं घबाड

मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. आज सकाळपासूनचे चिपळून, खेड, दापोली परिसरात पावसाला सुरूवात झाल्याने मान्सूच्या प्रतिक्षेत असलेला शेतकरी राज सुखावला आहे. यासोबतच यवतमाळ जिल्ह्यात देखील पावसाचे आगमन झाले आहे. ११ जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले होते मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली होती. आता पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.