Ajit Pawar Interview: PM मोदींचं भवितव्य काय? त्यांना हरवणं शक्य आहे का? अजित दादांनी स्पष्टच सांगितलं

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीच्या निमित्ताने ते बोलत होते.
Modi_Pawar
Modi_Pawar
Updated on

चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या देशातील सर्वातील शक्तीशाली नेते आहेत. भाजपनंही निवडणुकांमध्ये 'मोदी है तो मुमकीन है' असा जोरदार प्रचारही केला आहे. पण याच PM मोदींचं येत्या निवडणुकीत काय होईल? त्यांना हरवणं शक्य आहे का? एकूणच त्यांचं भवितव्य कसं असेल? अशा विविध प्रश्नांची उत्तर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहेत. चिंचवडमध्ये ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीच्या निमित्ताने ते बोलत होते. (What is future of PM Modi Is it possible to beat them Ajit Pawar clearly said in Interview)

Modi_Pawar
Ajit Pawar: "...तर आर आर पाटील मुख्यमंत्री झाले असते"; अजितदादांनी सांगितल 'त्यावेळी' नेमकं काय घडलं?

अजित दादा म्हणाले, केवळ भाजप काम करत नाही. या पक्षाला बळ देण्याचं काम आरएसएस करतं, बजरंग दल, हिंदू महासभा, भारतीय किसान संघ, विश्व हिंदू परिषद असे वेगवेगळे ग्रुप त्यांच्यामध्ये काम करतात, असं कुठल्याही राजकीय पक्षात काम चालत नाही. पूर्वीच्या काळात सेवादल काम करायचं. पण आत्ताच्या काळातील राजकीय पक्षांच्या कामाची पद्धत आणि भाजपच्या कामाची पद्धत फार वेगळी आहे. हे जरी खरं असलं तरी जनतेनं ठरवलं की यांना निवडून द्यायचं तर त्यांना ते निवडून देतात.

Modi_Pawar
Karnataka NCP: 'कर्नाटक'साठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज! विधानसभा निवडणुकीत लढवणार 'इतक्या' जागा

देशात विविध काळात विविध लोक सत्तेत आले, तसेच २०१४ मध्ये मोदी आले. उद्याच्या काळात भारतात आणखी कोणी एखादा नेता उदयला येऊ शकतो. जो संपूर्ण देशाचा आणि नागरिकांचा विश्वास संपादन करु शकतो. कधीच कोणाचं कोणापासून नडतं नसतं. ही प्रक्रिया निरंतर सुरु असते. एखादा असाही काही मुद्दा निर्माण होऊ शकतो की त्यांच्या मनात जर तो रुजला तर बदलही घडू शकतो, अशा शब्दांत अजित पवारांनी मोदींच्या भवितव्यावरही भाष्य केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com