'महाडीबीटी योजना' बनली असून अडचण नसून खोळंबा; शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष, नेमकं काय आहे कारण?

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजना चालू आहेत.
Maha DBT Scheme
Maha DBT Schemeesakal
Updated on
Summary

गेल्या दोन वर्षांपासून ठिबक सिंचनाचा शेतकऱ्यांना वेळेवर लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून उसनवारी घेऊन महागड्या कंपन्यांचे संच बसवले आहेत.

संख : महाराष्ट्र शासन कृषी विभागाची (Department of Agriculture Government of Maharashtra) महाडीबीटी योजना (Maha DBT Scheme) असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली असून मागील वर्षातील ठिबक सिंचन, अवजारे, शेततळे, अस्तरीकरण, ट्रॅक्टर अनुदान या योजनांचे लाभार्थी शेतकऱ्यांना (Farmers) अनुदान जमा झालेले नाही, तर काही शेतकऱ्यांना २२ महिन्यांनंतरही अनुदान जमा होण्याची प्रतीक्षा करावी लागत असून, त्यामुळे शेतकरी या योजनेबद्दल रोष व्यक्त करीत आहेत.

Maha DBT Scheme
आयुष्यमान भारत, फुले जनआरोग्य योजनेचा सीमाभागातील 865 गावांना होणार लाभ; 1,356 आजारांवर मोफत उपचाराची सोय

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजना चालू आहेत; परंतु या योजनेची निवड हंगामावेळी न करता कोणत्याही वेळी लॉटरी पद्धतीने होत असते. कृषी विभागाच्या (Department of Agriculture) सर्व योजना ऑनलाईन असल्याने कधीही कोणत्याही योजनेची निवड ही कधीही होत असल्याने शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कृषी विभागाला वेळेचे व हंगामाचे भान नाही.

फळबाग लागवड योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड ही अनेकदा बिगर हंगामात केली जात आहे. शिवाय बहुतांश योजनेचे अनुदानही एक ते दोन वर्षांपासून थकले आहे. त्यामुळे जत तालुक्यातील शेतकरी कृषी कार्यालयाला अनुदानासाठी हेलपाटे मारत आहेत. अनुदान रक्कम कधी येणार हे निश्चित कुणाला माहिती नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

Maha DBT Scheme
देवगडमधील शिरगावात सापडले प्राचीन कातळचित्र; हत्तीचे पाय अन् वाघाच्या जबड्याप्रमाणे दिसते चित्र, पण..

गेल्या दोन वर्षांपासून ठिबक सिंचनाचा शेतकऱ्यांना वेळेवर लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून उसनवारी घेऊन महागड्या कंपन्यांचे संच बसवले आहेत. परंतु त्याचे अनुदान अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांचे हाल म्हणजे ‘भिक नको, कुत्रा आवर’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. यावर्षी जत तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याने तसेच मागील २-३ वर्षांत पावसाअभावी वाळून गेलेली फळबाग, जत तालुक्याला वरदान ठरलेल्या व कमी पाण्यात जगणाऱ्या, चांगले उत्पन्न देणाऱ्या डाळिंब, सीताफळ यांसारख्या फळबागांची लागवड करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत.

Maha DBT Scheme
Piles Symptoms : मूळव्याध, फिशर, फिस्टुला कोणता आहे आजार? याची कशी होते सुरुवात आणि काय आहेत लक्षणे?

लागवड करण्याचा योग्य हंगाम शास्त्रोक्त पद्धतीने जून- जुलैमध्ये करण्यासाठी योग्य काळ आहे; परंतु फळबागेची निवड अद्याप झालेली नाही. त्याबरोबरच ठिबक सिंचन अवजारे, शेततळे, अस्तरीकरण अशा कोणत्याही योजनेची अद्याप निवड झालेली नाही. लागवड करण्याची वेळ निघून गेल्यानंतर लाभार्थी निवड होत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा काही उपयोग होत नाही. नवीन आर्थिक वर्ष चालू होऊन ३ महिने उलटून गेले तरीही शासन शेतकऱ्यांच्या योजनेकडे डोळे उघडून बघत नाही. शेतकऱ्यांच्या अडचणीचे शासनाला काहीही देणे- घेणे नाही, असा आरोप होऊन शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

वेळेचे व हंगामाचे भान ठेवून शासनाने याचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या योजनेत शेतकऱ्यांना अडचण येत असेल तर कृषिमंत्र्यांच्या स्वप्नातला समृद्ध शेतकरी कधी पाहायला मिळेल, असा सवाल करण्यात येत आहे. शिवाय प्रलंबित विविध योजनांचे अनुदान त्वरित जमा करावे अन्यथा शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.