कोणता वाहतूक नियम मोडल्यावर किती दंड? शाळा-महाविद्यालयांबाहेर आता सकाळी 6 ते 9 या वेळेत वाहतूक पोलिसांची गस्त; 7 सीटची क्षमता असलेल्या स्कूलबसमध्ये 21 विद्यार्थी

अल्पवयीन विद्यार्थी वाहन चालवतात, विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला येताना पालक वाहतूक नियम पाळत नाहीत, शाळा- महाविद्यालयांध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी असतात. त्या वाहनांकडे कागदपत्रे, विद्यार्थी वाहतुकीचा परवाना देखील नसतो.
traffic police
traffic policesakal
Updated on

सोलापूर : अल्पवयीन विद्यार्थी वाहन चालवतात, विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला येताना पालक वाहतूक नियम पाळत नाहीत, शाळा- महाविद्यालयांध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये (स्कूलबस, रिक्षा) क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी असतात. त्या वाहनांकडे कागदपत्रे, विद्यार्थी वाहतुकीचा परवाना देखील नसतो. या पार्श्वभूमीवर आता वाहतूक पोलिस दररोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत शहरातील सर्वच शाळा- महाविद्यालयांबाहेर गस्त घालणार आहेत. अधिकारी व अंमलदारांना शाळा वाटून देण्यात आल्या आहेत.

सणासुदीच्या काळात सोलापूर शहरातील रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये वाहनांच्या पार्किंगची सोय नसल्याने अनेकजण रस्त्यालगत वाहने उभी करतात. याशिवाय मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई केली जात आहे. विशेष बाब म्हणजे शाळा- महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बेशिस्त वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून सर्वाधिक फोकस केला जात आहे. त्यासाठी दररोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत त्याठिकाणी वाहतूक पोलिस कारवाई करणार आहेत. दुसरीकडे रात्री नऊ ते ११ वाजेपर्यंत देखील बेशिस्त वाहनांवर स्पेशल ड्राईव्ह घेऊन कारवाई केली जात आहे.

कोणता नियम मोडल्यावर किती दंड...

  • विनापरवाना वाहन चालविणे : पाच हजार रुपये

  • परवाना नसलेल्यास वाहन चालवायला देणे : पाच हजार रुपये

  • मूळ लायसन्स सोबत नसणे : ५०० रुपये

  • अतिरिक्त प्रवासी वाहतूक : प्रतिप्रवासी २०० रुपये

  • ट्रिपल सिट दुचाकी चालविणे : एक हजार रुपये व तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित

  • पोलिस इशाऱ्याचे उल्लंघन : ५०० रुपये

  • विनानंबरप्लेट वाहन चालविणे : ५०० रुपये

  • शिकाऊ चालकासोबत प्रशिक्षक नसणे : ५०० रुपये

  • सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना अडथळा, धोका, गैरसोय होईल असे वाहन उभे करणे : ५०० रुपये

  • दारू पिऊन वाहन चालविणे व चुकीच्या दिशेने वाहन चालविणे : कोर्ट केस

  • धोकादायकरित्या वाहन चालविणे : कोर्ट केस व २०० रुपये

  • विना रजिस्ट्रेशन किंवा विना इन्शुरन्स वाहन चालविणे : प्रत्येकी २ हजार रुपये

  • सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे : ५०० रुपये व त्यानंतर १ हजार ५०० रुपये

  • वाहन चालविताना मोबाईलचा वापर : दोन हजार रुपये

  • फ्रंट सीट वाहन चालविणे : ५०० रुपये

  • प्रेशर, मल्टी हॉर्न : ५०० रुपये व त्यानंतर १५०० रुपये

  • वाहतूक चिन्ह फलकांचे अनुपालन न करणे : ५०० रुपये

  • विना सायलेन्सर वाहन चालविणे : ५०० रुपये

  • विना गणवेश वाहन चालविणे : ५०० रुपये

  • विना पीयुसी प्रमाणपत्र वाहन चालिविणे : ५०० रुपये

  • एक दिवस मार्गावर प्रवेश बंदी : ५०० रुपये

  • नो पार्किंग परिसरात वाहन पार्क करणे : कोर्ट केस

  • विना हेल्मेट वाहन चालविणे : १००० रुपये व तीन महिन्यासाठी परवाना निलंबित

  • फॅन्सी नंबरप्लेट : एक हजार रुपये

  • वाहनात मोठ्या आवाजात संगीत, गाणी लावणे : एक हजार रुपये

  • विना (एल) फलक वाहन चालविणे (लर्निंग लायसन्स) : ५०० रुपये व त्यानंतर १५०० रुपये

  • तुटलेले क्रमांक फलक : ५०० रुपये व त्यानंतर १५०० रुपये

  • मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक : ५०० रुपये व त्यानंतर १५०० रुपये

  • गाडीला आरसा, इंडिकेटर नसणे : प्रत्येकी ५०० रुपये

  • बुलेट सायलेन्सरमध्ये बदल : १ हजार रुपये

  • टॅप लाईट बंद असणे : ५०० रुपये

परवाना सात सीटचा अन्‌ वाहतूक २१ विद्यार्थ्यांची

बाळे परिसरातून सरस्वती चौकातील एका शाळेत विद्यार्थी घेऊन येणाऱ्या स्कूलबसवर वाहतूकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांनी कारवाई केली आहे. त्या वाहनाकडे विद्यार्थी वाहतुकीचे परमिट नव्हते, वाहनाचा इन्शुरन्स नव्हता, सात सीट वाहतूक करण्याची क्षमता असताना त्यात २१ विद्यार्थी होते. त्याच्यावर ९ हजार ५०० रुपये दंडाची कारवाई करण्यात आली असून त्याला गुरुवारी (ता. ५) न्यायालयात हजर करण्यात आले होते.

बेशिस्तांवर आता कडक कारवाई

विद्यार्थ्यांच्या वाहतुकीत हलगर्जीपणा करणाऱ्या वाहनांवर आता प्राधान्याने दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत शाळा- महाविद्यालयांबाहेर आमचे अधिकारी- कर्मचारी थांबतील. याशिवाय शहरातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांवरही कारवाई केली जात आहे.

- सुधीर खिराडकर, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.