चिंताजनक रुग्णवाढ! टास्कफोर्सच्या बैठकीत नव्या निर्बंधांबाबत काय झाली चर्चा?

Covid Task Force
Covid Task Forceesakal
Updated on

मुंबई: मुंबईमध्ये आज 3928 रुग्ण सापडले असून काल 2510 रुग्ण सापडले होते. सध्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा 8.5 झाला आहे, जो काल चार टक्क्यांवर होता. ठाणेमध्ये आज 864 तर पुण्यामध्ये 520 रुग्ण सापडेल आहेत. राज्यात (Maharashtra) आज एकूण रुग्णसंख्या 5368 आहे. 3900 कालची रुग्णसंख्या होती. अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने (State Health Department) दिली आहे. या पार्श्वभूमीवरच आज टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली आहे. टास्क फोर्सच्या (Corona task force) बैठकीमध्ये सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला, मात्र निर्बंध लावण्याबाबत कसल्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी दिली आहे.

Covid Task Force
प्रणव सखदेव, किरण गुरव, संजय वाघ यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार

आजच्या टास्कफोर्सच्या बैठकीमध्ये कोरोना रुग्णांच्या ट्रीटमेंटबद्दल चर्चा झाली. एकदा रुग्ण पोजिटिव्ह आल्यानंतर त्याला कशा पद्धतीने उपचार द्यावे, तसेच यासोबतच आता लहान मुलांचं देखील लसीकरण सुरू होत आहे. या लसीकरणामध्ये कोणत्या कार्यपद्धतीचा अवलंब करायचा या विविध विषयावर आजच्या बैठकीत चर्चा झाली.

आजच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. मात्र निर्बंध लावण्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत ओमिक्रॉनचा समूह संसर्ग झाला आहे की नाही, हे सांगण्यात सध्याच्या घडीला कठीण आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

21 डिसेंबर पासून आलेल्या पॉझिटिव्ह केसेसचा जिनोम स्क्विन्सिंग अहवाल आज किंवा उद्या मध्ये येईल, त्यानंतर कळेल ओमिक्रॉनचा समूह संसर्ग झाला आहे की नाही. तसेच या अहवालानंतरच चित्र स्पष्ट होईल की, ही वाढीव रुग्ण संख्या आहे की ओमिक्रॉमुळे आहे की डेल्टामुळे आहे की इतर विषाणूमुळे आहे, असं त्यांनी सांगितंलय.

Covid Task Force
अर्थमंत्र्यांची बजेटपूर्व बैठक; महागाईतून दिलासा देण्याची राज्यांची मागणी

सद्या ज्या पॉझिटिव्ह केसेस येत आहे त्यातील 95 टक्के केसेस या इमारतीतून आहेत तर पाच टक्के केसेस या स्लम आणि चाळीतून आहेत. 90 टक्के पेक्षा अधिक रुग्णांना कोणत्या प्रकारची लक्षणे नाहीत पाच टक्के पेक्षा कमी रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. वाढीचा दर हा खूप जास्त आहे आणि डब्लिंग रेट हा एक किंवा दोन दिवस असा सुद्धा आहे. लहान मुलांच्या 15 ते 18 वर्षाच्या लसीकरण सुरुवातीला मोठ्या जम्बो लसीकरण केंद्र मध्ये किंवा मोकळ्या जागेत लसीकरण केंद्र मध्ये केला जाईल अशा प्रकारचे नियोजन सुरू आहे, असं त्यांनी स्पष्टक केलंय.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पाच पेक्षा अधिक व्यक्ती एका जागेवर येऊ नये असे आदेश दिलेले आहेत गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी ,मैदानी इथे सुद्धा लोकांनी गर्दी करू नये, असं आवाहन केलंय तसेच पोलीस आणि मुंबई महापालिका प्रशासन सुद्धा गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पूर्णपणे तयार असेल, असंही त्यांनी सांगितलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()