निधनापूर्वी बाबासाहेबांनी अखेरच लिखाण कोणतं केलं होतं?

6 डिसेंबर 1956 मध्ये दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं.
Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkarsakal
Updated on

6 डिसेंबर 1956 मध्ये दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं. त्यामुळे या दिवसाला 'महापरिनिर्वाण दिन' म्हणून संबोधलं जातं. महापरिनिर्वाणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 डिसेंबर रोजी मुंबईमधील दादर येथील चैत्यभूमीवर बौद्ध धर्मानुसार बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

5 डिसेंबरला म्हणजे निधनाच्या आदल्या दिवशी सकाळी साडेआठच्या दरम्यान बाबासाहेबांना माईसाहेबांनी सकाळी उठले. सकाळीच दोघांनीही दोघांनी चहा घेतला. तितक्यात ऑफिसला जाण्यासाठी निघेलेले नानकचंद रट्टू जे बाबासाहेबांचे सेक्रेटरी होते ते तिथे आले. तेही चहा प्यायले आणि ते त्यांच्या कामासाठी घरातून निघाले. 

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

बाबासाहेबांची तब्बेत बरी नसल्यामुळे सकाळचा प्रात:र्विधी उरकण्यासाठी माईसाहेब त्यांना मदत करत असत. प्रात:र्विधी झाल्यानंतर मग नाश्त्यासाठी बाबासाहेबांना माईसाहेबांनी टेबलावर आणून बसवलं. बाबासाहेब, माईसाहेब आणि डॉ. मालवणकर हे बाबासाहेबांचे स्नेही आणि डॉक्टर होते. अशा तिघांनी एकत्रित नाश्ता केला आणि नंतर बंगल्याच्या व्हरांड्यात तिघेही गप्पा मारत बसले. त्यांनतर बाबासाहेबांना माईसाहेबांनी औषधं, इंजेक्शन देऊन त्या स्वयंपाकघरात कामाला गेल्या. त्यानंतर बाबासाहेब आणि डॉ. मालवणकर तिथंच गप्पा मारत बसले. 

मग माईसाहेबांनी बारा-साडेबारा वाजण्याच्या सुमारास बाबासाहेबांना जेवणासाठी बोलवायला गेल्या. तेव्हा बाबासाहेब लायब्ररीत लिहीत-वाचत बसले होते. ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनालेखनाचं काम ते पूर्ण करत होते. बाबासाहेबांना माईसाहेब जेवायला घेऊन आल्या. जेवण झाल्यावर बाबासाहेब झोपले. 

Dr. Babasaheb Ambedkar
आढावा राज्यघटना दुरुस्तींचा

माईसाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब रात्री उशिरापर्यंत लिहित-वाचत बसत. बऱ्याचदा त्यांची तंद्री लागली तर अखंड रात्र त्यांचं वाचन-लिखाण चालत असे. पण 5 डिसेंबरच्या रात्री नानकचंद रट्टू (बाबासाहेबांचे सेक्रेटरी) गेल्यानंतर बाबासाहेबांनी ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत सुधारणा केली. एस. एम. जोशी आणि आचार्य अत्रेंना, तसंच ब्रह्मी सरकारला पाठवण्यासाठीच्या पत्रांवर शेवटचा हात फिरवला आणि त्या दिवशी नेहमीपेक्षा लवकर म्हणजे सुमारे साडेअकराच्या सुमारास झोपी गेले.  पण 5 डिसेंबरची रात्र ही त्यांच्या आयुष्याची अखेरचीच रात्र ठरली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()