IAS Pooja khedkar: माझ्या येण्यापूर्वी कार अन्...केबिनची व्यवस्था करा; पूजा खेडकरची व्हॉट्सॲप चॅट उघड, काय केल्या होत्या मागण्या?

IAS Pooja khedkar: पोस्टिंगपूर्वीच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला व्हॉट्सॲपवर अनेक मेसेज आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या प्राथमिक तपासणी अहवालात या चॅटचे तीन स्क्रीनशॉट्सही समाविष्ट करण्यात आले आहेत.
IAS Pooja khedkar
IAS Pooja khedkarEsakal
Updated on

यूपीएससी परीक्षेसाठी बनावट प्रमाणपत्रे तयार करणाऱ्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या व्हॉट्सॲप चॅट्स देखील उघडकीस आल्या आहेत. या चॅटच्या माध्यमातून पूजा सिनियर केबिन, कार आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या करताना दिसत आहे. प्रशिक्षणार्थी आयएएसवर आरोप आहेत की, तिने प्रोबेशनवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना उपलब्ध नसलेल्या सुविधांची मागणी केली होती. नुकतीच महाराष्ट्र सरकारने तिची बदली केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोस्टिंगपूर्वीच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला व्हॉट्सॲपवर अनेक मेसेज पाठवण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या प्राथमिक तपासणी अहवालात या चॅटचे तीन स्क्रीनशॉट्सही समाविष्ट करण्यात आले आहेत. स्क्रीन शॉटमध्ये पूजा खेडकर कोणाशी तरी गप्पा मारत वाहन आणि आसन व्यवस्थेशी संबंधित प्रश्न विचारत असल्याचे दिसून येते.

मेसेजमध्ये काय लिहलं आहे?

NDTV च्या रिपोर्टनुसार, पूजा खेडकरने इंग्रजीत पाठवलेल्या सुरुवातीच्या मेसेजमध्ये स्वतःची ओळख करून दिली. लिहिले की, 'माझी पुण्यातील सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. दिवसे सरांनी तुमचा संपर्क क्रमांक दिला होता. मी ३ जून रोजी जॉईन होत आहे. मात्र, माझी काही कागदपत्रे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातून पुण्याला पाठवण्यात आली आहेत, जी मला आमच्या कार्यालयात मिळाली नाहीत. ते पूर्ण झाल्यावर कळवावे'.

IAS Pooja khedkar
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरच्या वडिलांनी पंकजा मुंडेंसाठी घातलं होतं साकडं, कोण आहेत दिलीप खेडकर ?

यानंतर पाठवलेल्या मेसेजमध्ये पूजा खेडकर हिने तिच्या कार्यालयाची आणि सरकारी वाहनाची माहिती विचारली. इकडे 'जिल्हाधिकारी सोमवारी याबाबत सरकारशी चर्चा करतील', असे उत्तर समोरून आले. रिपोर्टनुसार, 23 मे रोजी पूजा खेडकरने पुन्हा मेसेज केला की, 'घर, प्रवास, केबिन वगैरेबद्दल काही अपडेट आहे का?' यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दुसऱ्या दिवशी प्रशिक्षणार्थी IAS ने विचारले, 'कृपया उत्तर द्या, हे आवश्यक आहे.' समोरून रिप्लाय आला, 'गुड मॉर्निंग... तुम्ही आल्यावर बघू.'

रिपोर्टनुसार, यानंतर पूजा खेडकरने लिहिले की, मला वाटते की मी जॉईन होण्यापूर्वी हे केले पाहिजे, नंतर नाही. माझ्याकडे प्लॅन करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत आणि ते नंतरसाठी सोडू शकत नाही.

त्यानंतर तिने पुन्हा मेसेज केला, 'कॉल बॅक करण्यात काही अडचण आहे का?' रिपोर्टनुसार, चार दिवसांनी पुन्हा तिने मेसेज केला, 'मी 3 जूनला जॉईन होण्यापूर्वी केबिन आणि वाहन तयार ठेवा. यासाठी नंतर वेळ मिळणार नाही. हे करता येत नसेल तर मला कळवा. मी जिल्हाधिकारी साहेबांशी बोलेन...'.

IAS Pooja khedkar
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर यांचे वडील आहेत कोट्यधीश; वंचितकडून लढवली होती लोकसभा निवडणूक

पीएमओने मागवला अहवाल

हिंदुस्तान टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पंतप्रधान कार्यालयाने या संदर्भात पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. याशिवाय एलएसबीएनएएने राज्य सरकारकडून खेडकर यांच्याशी संबंधित अहवालही मागवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com