1989 च्या दंगलीत मुंबई होरपळत होती, तेव्हा एकनाथ शिंदेंनी वाचवला एका मुलाचा जीव

1989 Mumbai Riots
1989 Mumbai Riotsesakal
Updated on
Summary

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीय.

महाराष्ट्रात 10 दिवसांपासून सुरू असलेली राजकीय उलथापालथ संपलीय. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीय, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारली आहेत. शपथविधीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेचं रक्षण करण्याचं आश्वासन दिलंय, त्यावर त्यांचे शेजारी भावूक झालेत.

शिंदे यांनी नेहमीच रक्षकाची भूमिका बजावली असल्याचं ते सांगतात. लोकांनी शिंदे यांच्याशी संबंधित किस्साही कथन केला, यामध्ये त्यांनी दंगलीत होरपळलेल्या मुंबईतील एका निष्पापाचं प्राण वाचवलं. एकनाथ शिंदे यांच्या शेजाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे हे ठाण्यातील एका चाळीत राहत असतानाचा किस्सा सांगितला. ही गोष्ट सुमारे 35 वर्षे जुनी आहे. शिंदे हे अत्यंत नम्र असून लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचं त्यांनी सांगितलं.

1989 Mumbai Riots
नव्या मंत्रिमंडळात कोणाची लागणार वर्णी? उदयनराजेंनी घेतली फडणवीसांची भेट

1989 साली मुंबई दंगलीत (Mumbai Riots) होरपळून निघाली होती, त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या जीवाची पर्वाही केली नसल्याचं लोकांनी सांगितलं. त्यावेळी शिंदेंनी एका महिलेला आणि तिच्या मुलाला मदत केली. वास्तविक, दंगलीच्या काळात वाहतुकीचं कोणतंही साधन उपलब्ध नव्हतं. अशा स्थितीत शिंदे यांनी महिलेला व तिच्या मुलाला आपल्या ऑटोतून रुग्णालयात नेलं. त्या रात्री शिंदे स्वतः ऑटो चालवून घेऊन गेले होते.

1989 Mumbai Riots
मायावतींनंतर JDS चे कुमारस्वामी देणार भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा!

शेजारी पुढे सांगतात, शिंदे एक अद्भुत व्यक्ती आहे आणि सर्वांना मदत करण्यास तयार असतात. त्यांनी ज्या प्रकारची निष्ठा आणि समर्पणाचा आदर्श ठेवलाय, ते कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी घोषणा करून सर्वांनाच चकित केलं. यासोबतच त्यांनी स्वत: सरकारमधून बाहेर राहण्याबाबतही माहिती दिली होती. मात्र, पक्षप्रमुखांच्या सूचनेनुसार त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.