गोपीनाथ मुंडेंचा पुतळा बनवाल तर याद राखा... धनंजय मुंडेंनी घरी बोलावून दिला दम; 'या' नेत्याचा गंभीर आरोप

Dhananjay Munde on statue of Gopinath Munde nitin Deshmukh says: गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले होते. यावेळी आम्ही अल्पकालावधीमध्ये मेणाचा पुतळा तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी मला बंगल्यावर बोलावलं.
Dhananjay Munde
Dhananjay Munde
Updated on

मुंबई- शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी मंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. घरी बोलावून धनंजय मुंडे यांनी मला दम दिला होता, असा दावा त्यांनी केला आहे. लोणावळ्यात म्युझियममध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा मेणाचा पुतळा तयार करण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता, असा आरोप देखील नितीन देशमुख यांनी केला आहे.

गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले होते. यावेळी आम्ही अल्पकालावधीमध्ये मेणाचा पुतळा तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी मला बंगल्यावर बोलावलं. त्यांनी मला दम दिला की, जर तू गोपीनाथ मुंडेंचा मेणाचा पुतळा बनवलास तर माझ्या इतका कोणी वाईट असणार नाही, असं नितीन देशमुख म्हणाले आहेत.

Dhananjay Munde
Dhanjay Munde : मोठा भाऊ म्हणून पंकजांचे स्वागत करतो ; गोपीनाथगडावर ‘हा’ माझ्यासाठी भावनिक दिवस

स्वत:च्या काकाबाबत धनंजय मुंडे असा विचार करतात. त्यांची प्रतिक्रिया पूर्ण महाराष्ट्राला कळायला हवी. मी खरं बोलतोय की नाही हे धनंजय मुंडे यांनीच सांगावं, असं आव्हान देखील नितीन देशमुख यांनी केलं आहे. नितीन देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Dhananjay Munde
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना पंकजांच्या पराभवाच्या अजूनही वेदना; म्हणाले, पाडण्यासाठी...

गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं तेव्हा धनंजय मुंडे हे अखंडीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आता ते अजित पवार गटामध्ये गेले आहेत. तसेच, अजित पवार गट हा राज्यात भाजपसोबत सत्तेमध्ये आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या शरद पवारांवरील टीकेनंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली होती. अमित शहा बोलत असतील तर त्यात काही तथ्य असेल असं ते म्हणाले होते.

धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर शरदचंद्र पवार गट आक्रमक झाला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर शरद पवार गटाकडून टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.