सुशासनाचे वचन केव्हा पूर्ण होणार ? भाजप महिला आघाडीचा ठाकरेंना टोला

sheetal gambhir desai
sheetal gambhir desaisakal media
Updated on

मुंबई : पाचशे चौरस फुटापेक्षा लहान घरांचा मालमत्ताकर माफ केल्याबद्दल (Property tax relief ) स्वतःची पाठ थोपटून घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यात सुशासन आणण्याचे वचन केव्हा पूर्ण करणार, असा प्रश्न मुंबई भाजप (Mumbai BJP) महिला आघाडीच्या प्रमुख शीतल गंभीर देसाई (Sheetal Gambhir desai) यांनी विचारला आहे. (When good governance promise will be completed sheetal gambhir desai criticizes uddhav Thackeray)

sheetal gambhir desai
मुंबई : डिसिल्व्हा कंपाऊंडमध्ये भीषण आग

मुंबईतील पाचशे चौरस फुटांपेक्षा लहान घरांचा मालमत्ता कर माफ केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली होती. ही घोषणा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन, मात्र मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आपल्याला राजकीय लाभ व्हावा म्हणून ही घोषणा झाल्याचेही ध्यानात घेतले पाहिजे, असेही देसाई यांनी दाखवून दिले आहे.

अजूनही राज्यात महिला सुरक्षित नाहीत, शेतकरी सुखी नाही, दर्याचा राजा मच्छिमार आनंदी नाही, कोरोनामुळे नागरिक भयभीत आहेत, विद्यार्थी-परिक्षार्थी उमेदवार सुखी नाहीत, या सर्वांना दिलासा देण्याचे काम मुख्यमंत्री आणि त्यांचे तिघाडी सरकार कधी करणार, असा प्रश्न देसाई यांनी विचारला आहे. सुशासन आणण्याचे वचन मी केव्हाही दिलेच नव्हते, त्यामुळे सुशासन आणण्यास मी बांधील नाही, ते काम भाजप सरकारने करावे, असा खुलासा कृपया मुख्यमंत्र्यांनी करू नये, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली आहे.

सामाजिक समतेच्या नुसत्या बाता मारणारे तिघा तिघा पक्षांचे अनुभवी नेते मंत्रीमंडळात जागा अडवून बसले आहेत. तरीही या राज्यात मराठा तसेच ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होते ही बाब भूषणावह निश्चितच नाही. ओबीसी आरक्षणाचा कोणी छुपा विरोधक मंत्रीमंडळात आहे का, याचा मुख्यमंत्र्यांनी शोध घ्यावा, असा टोलाही देसाई यांनी लगावला आहे. सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांपासून महिला अजूनही सुरक्षित नाहीत. इतकेच नव्हे तर सत्ताधारी आमदारांच्या टगेगिरीचा सामना आता पोलिसांनाही करावा लागल्याचे व्हिडियो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होत आहेत. वादळग्रस्तांना-शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळाली नाही, या गोंधळाकडेही मुख्यमंत्र्यांनी जमल्यास लक्ष द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.