Prataprao Jadhav: पुस्तकाची तुला करताना खासदार प्रतापराव जाधव दुसऱ्या पारड्यात बसले अन्....; व्हिडिओ व्हायरल

बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे पहिल्यांदाच केंद्रात मंत्री बनले आहेत, त्यामुळं मतदारसंघात सध्या त्यांचे सत्कार होत आहेत.
Prataprao Jadhav
Prataprao Jadhav
Updated on

मुंबई : बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे पहिल्यांदाच केंद्रात मंत्री बनले आहेत. यानंतर त्यांच्या मतदारसंघात त्यांचे विविध संघटना आणि व्यक्तींकडून जाहीर सत्कार केले जात आहेत. एका गटाकडून त्यांची नुकतीच पुस्तकांची तुला करण्यात आली. पण ही तुला सुरु असताना असं काहीतरी घडलं ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरुए. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

Prataprao Jadhav
BS Yediyurappa: येडीयुरप्पांना दिलासा! POCSO अंतर्गत होणारी अटक तुर्तास टळली; हायकोर्टानं काय म्हटलंय वाचा?

बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना नेते प्रतापराव जाधव हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. सेनेचे ज्येष्ठ नेते असल्यानं यंदा त्यांची केंद्रात मंत्रीपदी वर्णी देखील लागली. त्यांना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. तसंच आयुष मंत्रालयाचं राज्यमंत्रीपदही (स्वतंत्र कार्यभार) त्यांच्यावर सोपवण्यात आला आहे.

Prataprao Jadhav
MVA Seat Sharing: विधानसभेसाठी मविआची तयारी सुरु, जागा वाटपाबाबत मोठी अपडेट! वर्षा गायकवाडांनी थेट सांगितलं

नेमकं काय घडलं?

केंद्रात मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर मिळाल्यानं बुलडाण्यात प्रतापराव जाधव यांचा मोठा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून पुस्तकांची तुला करण्यात आली. यामध्ये मोठ्या तराजूच्या एका पारड्यात पुस्तकांची रास ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या पारड्यात प्रतापराव जाधव स्वतः बसत होते. पण बसतानाच अचानक त्या पारड्याची साखळी तुटली. त्यामुळं प्रतापराव जाधव खाली पडता पडता वाचले. यावेळी जवळच असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला.

पण याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळं त्याची दिवसभर सर्वत्र चर्चा सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.