पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करणारे आचार्य तुषार भोसले कोण आहेत? वाचा सविस्तर

Who is Acharya Tushar Bhosle? he Criticise on Prithviraj Chavan
Who is Acharya Tushar Bhosle? he Criticise on Prithviraj Chavan
Updated on

मुंबई : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोनं कर्जाने ताब्यात घ्यावं, असा पर्याय माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवला. यावरुन आचार्य तुषार भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोण आहेत आचार्य तुषार भोसले?
आचार्य तुषार भोसले हे भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आहेत. तसेच ते वारकरी संप्रदायाचे व अध्यात्मिक क्षेत्रातील आचार्य आहेत, असे सांगितले जाते. यापूर्वी अनेकदा त्यांनी मंदिराच्या प्रश्नावरून महाराष्ट्रातील नेत्यांना खडे बोल सुनावलेले आहेत. राज्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांची तुलना शिवसेना नेते संजय राऊत यांनी विठ्ठलाशी केली होती. यावरच तुषार भोसले यांनी टीका केली होती. तसेच, आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना विठ्ठलाची पूजा करण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही जोपर्यंत ते राऊतांच्या वक्तव्याप्रकरणी खुलासा व्यक्त करत नाही, असा पवित्राही तुषार भोसले यांनी घेतला होता. दरम्यान भोसले यांचा हा व्हीडिओ महाराष्ट्र भाजपने ट्वीट केला होता. तसेच, पृथ्वीराज चव्हाण यांना ठणकावणारा व्हिडिओही नागपूर भाजपच्या अकाऊंटवरून ट्विट करण्यात आला होता.

दरम्यान, सोशल मिडीयावर आचार्य तुषार भोसले यांचे खरे नाव हे तुषार भोसले नसून तुषार शालीग्राम पितांबर असल्याचीही सध्या जोरदार चर्चा आहे. तुषार भोसले यांच्या नावावरून असलेल्या चर्चेवर त्यांनी खुलासा केला असून तुषार भोसले म्हणतात, माझे नांव तुषार शालिग्राम भोसले असून "शास्त्री" व "आचार्य" या पदव्या मी संपादित केल्या आहेत. परंतु काही लोकांनी जाणीवपूर्वक माझी बदनामी करण्याकरिता माझे खरे नाव आचार्य तुषार भोसले नसून तुषार शालिग्राम पितांबर असे आहे व हा बहुजन नसून ब्राह्मण आहे असा सोशल मिडीयात अपप्रचार सुरु केला आहे. तरी माझे खरे नाव आचार्य तुषार शालिग्राम भोसले हेच आहे.
-------------
पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत काशी विश्वनाथ मंदिराचा मोठा निर्णय; काय आहे प्रकरण?
---------
पृथ्वीराज चव्हाणांना काय म्हणाले तुषार भोसले? 
पृथ्वीराज चव्हाणांचं डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल तुषार भोसले यांनी केला होता. आचार्य तुषार भोसलेंनी चव्हाण आणि काँग्रेसवर शरसंधान साधत सरकारला देवस्थानांचं सोनं ताब्यात घेण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं होतं. पृथ्वीराज चव्हाण , देवस्थानं खासगी मिळकत आहे का? त्यांच्या संपत्तीला ताब्यात घेण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी? ज्यावेळी देवस्थानांना काही देण्याची वेळ होती तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा, तेव्हा तुमच्या हाताला लकवा मारला होता आणि देवस्थानांकडे संपत्ती मागण्यासाठी तेच हात पुढे करताना लाज वाटत नाही? एवढीच जर तुम्हाला सरकारची काळजी आहे, तर तुम्ही ज्यांची हुजरेगिरी करता त्या तुमच्या नेत्यांना सांगा. सोनिया गांधींना सांगा त्यांची संपत्ती सरकारला द्यायला. त्यांचा जावई रॉबर्ट वाड्रांना सांगा. पी. चिदंबरमला सांगा. सुरेश कलमाडीला सांगा. सामान्य जनतेच्या कष्टाचा पैसा त्यांनी घरात पुरुन ठेवला, त्यातला रुपया देण्याची त्यांची नियत नाही आणि लोकांनी श्रद्धेनं देवस्थानांना, मंदिरांना दान दिलेली संपत्ती तुम्ही ताब्यात घ्यायला सांगता? तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा अधिकार नाही, अशा शब्दांत भोसले माजी मुख्यमंत्र्यांना ठणकावले होते.
----------
लॉकडॉऊन 4:0 च्या गाईडलाईन जाहीर; काय चालू, काय बंद?
---------
महाराष्ट्रातील 'या' ०७ शहरांना लॉकडाऊन 4:0 मध्ये सूट नाहीच
----------
धक्कादायक ! ज्येष्ठ साहित्यिकाचं कोरोनामुळे निधन
----------
काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशवासीयांना संबोधित करताना आत्मनिर्भरतेसाठी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. सर्व घटकांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या पॅकेजमुळे देश स्वावलंबी होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला होता. मोदींच्या या आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, मी यापूर्वीच बोललो होतो, देशाला २१ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची आवश्यकता आहे. त्यानंतर, चव्हाण यांनी अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी पर्याय सूचवला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे, असे ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.