Pooja Khedkar: पूजा खेडकरचा पर्दाफाश करणारा वैभव कोकाट नेमका कोण? त्याने प्रकरण कसे उघडकीस आणले?

Vaibhav Kokat who exposed ias Pooja Khedkar: हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर यूपीएससीसह केंद्र आणि राज्यातील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.
Vaibhav Kokat
Vaibhav Kokat
Updated on

मुंबई- वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरविरोधात अखेर केंद्रीय लोकसेवा आयोगाने कारवाईचा बडगा उगारला मात्र संपूर्ण देशात खळबळ उडालेल्या या प्रकरणाला वाचा फोडली, ती वैभव कोकाट या तरुणाने. एका ट्वीटमुळे पूजा खेडकर प्रकरण उघडकीस आले आणि त्याची देशभरात चर्चा सुरू झाली. एका ट्वीटमुळे एखाद्या आयएएस अधिकाऱ्याची नोकरीही जाऊ शकते, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते, असे वैभव कोकाट यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

निवृत्त सनदी अधिकाऱ्याची मुलगी असलेल्या पूजा खेडकर यांनी बनावट जात प्रमाणपत्र आणि अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून आयएएस रँक मिळवली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर यूपीएससीसह केंद्र आणि राज्यातील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.

Vaibhav Kokat
Pooja Khedkar Case : खेडकर दांपत्याच्या बंगल्याची ग्रामीण पोलिसांकडून झडती; पिस्तूल, तीन काडतुसे व लॅंड क्रुझर कारही जप्त

असे झाले प्रकरण उघड ....

अगदी काल-परवापर्यंत पूजा खेडकर कोण आहेत, हेही माहीत नसलेल्या वैभव यांनी हे प्रकरण कसे उघडकीस आणले, याबाबत 'सकाळ'ला सांगितले. ते म्हणाले, पूजा यांच्या वागणुकीबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी एक अहवाल राज्य सरकारकडे पाठवला होता. एका मित्राच्या माध्यमातून तो माझ्यापर्यंत पोहोचला.

उत्सुकतेपोटी मी तो वाचला असता, एक प्रशिक्षणार्थी अधिकारी एवढा माज कसा दाखवू शकतो, याबाबत मला आश्चर्य वाटले. त्यानंतर या प्रकरणाच्या खोलात गेल्यावर ज्या ऑडी कारवर पूजा यांनी बेकायदा अंबर दिवा लावला होता, त्याचे फोटो मिळवले. हे पुरावे घेऊन पोलिसांकडे जाण्याचा पर्याय माझ्याकडे होता; मात्र या प्रकरणातील प्रशासकीय असंवेदनशीलता बघता पोलिसांकडे जाण्यापेक्षा समाजमाध्यमांवर ते पोस्ट करण्याचे मी ठरवले, असं कोकाट म्हणाला.

२६ जुलै रोजी पूजा खेडकर यांच्याबाबतची माहिती फोटोसह 'एक्स'वर टाकली. सर्वच प्रसारमाध्यमांनी या पोस्टची दखल घेत बातम्या केल्या. अनेक सामाजिक आणि आरटीआय कार्यकर्त्यांनी मला फोन केले. त्यानंतर पूजा यांच्यासंदर्भात एकापाठोपाठ एक गैरप्रकार उघड होऊ लागले. राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाची दखल घेताच, केंद्र व राज्य सरकार कामाला लागले, असं तो म्हणाला.

अनेकांचे धाबे दणाणले

खेडकर प्रकरणानंतर स्पर्धा परीक्षांतील अनियमितता, नियुक्त्यांबद्दल असंख्य तक्रारींचा पूर वैभव यांच्याकडे येत आहे. प्रकल्पग्रस्त उमेदवार त्यांच्यावरील अन्यायाच्या तक्रारी आणत आहेत. या प्रकरणाचा धसका घेऊन अनेक आयएएस अधिकाऱ्यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केले; तर अनेकांनी समाज माध्यमांवर लिहिणेही बंद केल्याचे वैभव यांनी सांगितले.

Vaibhav Kokat
Pooja Khedkar: पूजा खेडकरच्या आईची पिंपरी चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; 'हे' कारण ठरलं महत्त्वाचं...

वैभव कोकाट कोण?

हे प्रकरण सर्वप्रथम शोधून काढले ते बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या वैभव कोकाट यांनी. सामाजिक आणि राजकीय विषयांवर लिखाणाची आवड असलेल्या वैभव यांनी एका पीआर कंपनीत काही काळ कामही केले.. त्यांच्या एक्स हॅण्डलला २९ हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.