Bharat Gogawale: मंत्रिपदासाठी उपेक्षा मात्र, शिंदेसेनेचे भरत गोगावलेच ठरले महत्वाचे..

Shivsena MLA Disqualification Case : दीड वर्षांच्या काळानंतर आज शिवसेनेच्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज अंतिम निर्णय आला आहे. मंत्रीपदाची आस लावून बसलेले भरत गोगावले आज पात्र ठरले आहेत.
Bharat Gogawale
Bharat GogawaleEsakal
Updated on

आज संपुर्ण राज्यासह देशाचं लक्ष शिवसेना आमदार आपात्रता प्रकरणाच्या निकालाकडे लागलं होतं. गेल्या दीड वर्षापासूनचा सत्तासंघर्षातील आमदार आपात्रतेबाबतच्या प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या १६ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. तर शिंदे गटाने देखील उद्धव ठाकरे यांच्या १४ आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. आज निकाल देताना नार्वेकर यांनी शिंदेंचे 16 आमदार पात्र ठरलले आहेत. 16 आमदारांना अपात्र करण्याची याचिका फेटाळण्यात आली आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदें यांचीच असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेत बंड झाल्यापासून मंत्रीपदाची आस लावून बसलेल्या महाड मतदारसंघाचे आमदार आणि शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले पात्र ठरले आहेत. भरत गोगावलेंची प्रतोदपदी निवड वैध ठरवली आहे. तर भरत गोगावले यांची नियुक्ती योग्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Bharat Gogawale
Shiv Sena MLA Disqualification Result: शिंदेंची सेना जिंकली! 16 बंडखोर आमदार ठरले पात्र; मुख्यमंत्रीपदही वाचलं

आमदार भरत गोगावले यांचा राजकीय प्रवास

एक सरपंच ते आमदार असा भरत गोगावले यांचा राजकीय प्रवास आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते प्रतोद आहेत. भरत गोगावले यांना कोणताही राजकीय वारसा नाही. त्यांचे वडील शेतकरी होते. भरत गोगावले यांनी त्यांच्या जन्मस्थळ असलेल्या पिंपळगाव येथून 1992 साली अपक्ष म्हणून सरपंच पदासाठी ते उभे राहिले आणि त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते.

त्यानंतर त्यांनी १९९२ मध्ये काँग्रेसकडे पंचायत समितीची निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मागितले. पण, त्यांना तिकीट मिळालं नसल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि ते जिंकले. त्यानंतर गोगावले सक्रिय राजकारणात उतरले. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेतील आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

Bharat Gogawale
MLA Disqualification Result: अजित पवार गटालाही तोच न्याय! राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याचेही चित्र निकालामुळे स्पष्ट?

२००९ मध्ये भरत गोगावले यांना शिवसेनेने पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले. त्यांनी महाडची विधानसभा जिंकली. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्येही ते विजयी झाले. ते तीन वेळा आमदार झाले आहेत.

गोगावले 2019 मध्ये उद्धव सरकारमध्ये मंत्री होणार अशी चर्चा होती. मात्र, त्यावेळी त्यांच्या पदरी निराशा आली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात भरत गोगावले यांनी साथ दिली. त्यानंतर त्यांच्याकडे प्रतोद पद देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.