Dr Ajeet Gopchade: भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिलेले अजित गोपछडे कोण आहेत? संधी मिळाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

Who is Ajit Gopchade nominated by BJP for Rajya Sabha नारायण राणे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना डावलून भाजपने डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गोपछडे हे कोण आहेत? अशी चर्चा सुरु झाली आहे.
Who is Ajit Gopchade nominated by BJP for Rajya Sabha
Who is Ajit Gopchade nominated by BJP for Rajya Sabha
Updated on

मुंबई- राज्यसभेसाठी भाजपकडून तीन नावे जाहीर करण्यात आली आहे. यात काँग्रेसमधून नुकतेच आलेले अशोक चव्हाण, पुण्याच्या मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश आहे. नारायण राणे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना डावलून भाजपने डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गोपछडे हे कोण आहेत? अशी चर्चा सुरु झाली आहे. (Who is Ajit Gopchade nominated by BJP for Rajya Sabha)

कोण आहेत अजित गोपछडे?

डॉ. अजित गोपछडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत घडलेले कार्यकर्ते आहेत. आरएसएसचे ते कट्टर स्वयंसेवक आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. नांदेड लोकसभा, नांदेड आणि नायगाव विधानसभेसाठी त्यांचं नाव कायम चर्चेत असायचं. सामाजिक, शैक्षणिक कार्यात ते अग्रेसर असतात असं सांगितलं जातं. महाविद्यालयात असताना मार्डच्या चळवळीचे गोपछडेंकडून नेतृत्व करण्यात आले होते.

Who is Ajit Gopchade nominated by BJP for Rajya Sabha
Rajya Sabha candidates by BJP: अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर, राणेंचा पत्ता कट

भाजप नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरींच्या संपर्कातून त्यांनी एबीव्हीपी परिषदेत काम केले आहे. आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात देखील त्यांचे काम महत्वाचं आहे. अजित गोपछडे हे बाल रोगमध्ये एसबीबीएस, एमडी आहेत. १९९२ मध्ये त्यांनी कारसेवा केली होती. बाबरी मशीद पडली त्यावेळी त्याच्या ढिगाऱ्यावर उभे राहून गोपछडे यांनी फोटो काढला होता.

Who is Ajit Gopchade nominated by BJP for Rajya Sabha
Political News: राज्यसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू; शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

गोपछडे यांची पहिली प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या समितीने घेतलेला हा निर्णय आहे. शेवटी पक्ष संघटना वाढवणे माझं काम आहे. सध्या मी गाव चलो अभियानात आहे. उमेदवारी जाहीर झाल्याचे मला देखील आत्ताच कळाले आहे. सध्या मला गाव चलो आंदोलन करायचं आहे. यादीमध्ये माझं नाव आल्याचं मला माध्यमातून कळत आहे, अशी प्रतिक्रिया अजित गोपछडे यांनी दिली.

मला जी जबाबदारी दिली आहे. त्याचे मी सोनं करुन दाखवीन. माझ्यापेक्षा इतर अनेक लोकांनी आरोग्य, वैद्यकीय क्षेत्रात काम केले आहे. मी अतिशय सामान्य माणूस आहे, सामान्य कार्यकर्ता आहे. तळागाळातून आलो आहे. माझे वडील शेतकरी आहेत. सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षाचा आणि जेष्ठांचा सन्मान करणे माझे काम आहे. उमेदवारी मिळाल्याने मी आनंदी आहे, असं गोपछडे म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.