Who is Laxman Hake : जरांगेंच्या गावात जाऊन ओबीसींसाठी उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके कोण?

Laxman Hake Latest Marathi News : गेल्या सहा दिवसांपासून ते अंतरवाली सराटीपासूनच ४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडीगोद्री येथे उपोषणावर बसलेत आणि त्यामुळे लक्ष्मण हाके सध्या राज्याच्या चांगलेच चर्चेत आलेत
Laxman Hake Latest Marathi News
Laxman Hake Latest Marathi News
Updated on

मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करण्यात यावा, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आंदोलन केलं. जालन्याच्या अंतरवाली सराटीतून सुरु झालेल्या त्यांच्या या लढ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला. जरांगे पाटील मराठा नेता म्हणून समोर आले. आपल्या आंदोलनातून त्यांनी सरकारच्याही नाकी नऊ आणल्या. लोकसभा निवडणूकीतही जरांगे फॅक्टरमुळे सरकारला मोठा फटका बसल्याचं बोललं जातं. मात्र आता जरांगे पाटलांच्या याच मागणी विरोधात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या मुद्दयावर आता ओबीसी समाज देखील तीव्र आंदोलनाच्या भुमिकेत आहे. आणि यातचं लक्ष्मण हाके हे देखील ओबीसीच्या मागणीसाठी उपोषणावर ठाम आहेत.

गेल्या सहा दिवसांपासून ते अंतरवाली सराटीपासूनच ४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडीगोद्री येथे उपोषणावर बसलेत आणि त्यामुळे लक्ष्मण हाके सध्या राज्याच्या चांगलेच चर्चेत आलेत. पण लक्ष्मण हाके नेमके आहेत कोण जाणून घेऊ व्हिडीओच्या माध्यमातून....

कोण आहेत लक्ष्मण हाके? ( Who is Laxman Hake?)

लक्ष्मण हाके हे मुळचे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर काही काळ त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम पाहिलं. लक्ष्मण हाके हे धनगर समाजातून येतात. त्यांच्या पत्नी विद्या हाके या देखील प्राध्यापक आहेत.

लक्ष्म हाके हे मागास वर्गीय आयोगाचे सदस्य आहेत. ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष आहेत, यासोबतच ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे कार्याध्यक्षपदावर देखील काम पाहिलं आहे. वेगवेगळ्या आंदोलनामुळे ते नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत आले. त्यातल्यात्यात पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजच्या वेशभुषेत केलेलं हाकेंच आंदोलन चांगलंच गाजलं होतं.

Laxman Hake Latest Marathi News
Viral Video : मोदींच्या कॅबीनेट मंत्र्यांना लिहिता आलं नाही 'बेटी बचाव बेटी पढाओ'; तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

ओबीसी नेता असल्यासोबत गेल्या विधानसभेपासून लक्ष्मण हाके यांनी राजकारणात देखील एन्ट्री केली. 2019ला लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शेकापचा बालेकिल्ला असणारा सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शहाजीबापू पाटलांनी बाजी मारली होती. आता येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत लक्ष्मण हाके शहाजीबापूंना टक्कर देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२ वर्षापूर्वीच म्हणजे शिवसेना फुटीनंतर म्हणजे 3 ऑगस्ट 2022 लक्ष्मण हाके यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधलं. मात्र ठाकरे गटात असूनही लक्ष्ण हाके यांनी पक्षाविरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध बंड करत माढा लोकसभा लढवली होती. लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना हाके महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे होता. त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी अपक्ष निवडणूक लढवली या वेळी त्यांना ५,१३४ मतं मिळाली होती.

Laxman Hake Latest Marathi News
Nalanda University: इसवी सन 427 मध्ये स्थापना..जगातील सर्वात मोठे शैक्षणिक केंद्र असलेले 'नालंदा' 700 वर्षांनी नामशेष कसे झाले?

दरम्यान आता लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते म्हणून समोर आलेत. त्यांच्या उपोषणस्थळी अनेक नेत्यांनी त्यांना भेट दिली.मराठा आरक्षणाचा ओबीसीत सामावेश नको या मुद्द्यावर ते ठाम आहेत. सगेसोयरे’बाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास केवळ ओबीसी नाही तर अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणालाही धोका आहे.असं लक्ष्मण हाके यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने ओबीसी संपविण्याचा शासनकर्त्यांचा घाट आहे, असा आरोप देखील लक्ष्ण हाके यांनी केला. त्यामुळे आता सरकारव दोन्ही समाजांच्या मागण्यांवर काय तोडगा काढतंय हे पाहणं महत्त्वाच ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.