Mangaldas Badal : कोण मंगलदास बांदल? शरद पवार गटाच्या नेत्यांना पडला सवाल, शिरूर लोकसभेची केलीय मागणी

Who is Mangaldas Badal : शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा शक्यतांच्या बातम्या येत आहेत त्याचे कारण म्हणजे एका नेत्याने दिलेली प्रतिक्रिया.
Mangaldas Badal
Mangaldas BadalEsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात पुण्यातील पवारांचं निवासस्थान असलेल्या मोदी बाग येथे बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला शरद पवार गटाचे काही आमदार आणि खासदार देखील उपस्थित होते. माध्यामांमध्ये शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा शक्यतांच्या बातम्या येत आहेत त्याचे कारण म्हणजे एका नेत्याने दिलेली प्रतिक्रिया.(Who is Mangaldas Bandal)

मंगलदास बांदल यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत म्हटलं की, सध्या महाराष्ट्रात ज्या प्रकारे राजकीय स्थित्यंतर सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात वेगानं घडामोडी घडत आहेत याविषयी चर्चा सुरु आहेत. उमेदवारी चाचपणी आणि पक्षाची नीती ठरवण्याचं काम सुरु आहे. मी लोकसभेची निवडणूक लढवणारच आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबतचा विषय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे. पण चर्चा सुरु आहे, याबाबत लवकरच कळेल आपल्याला असं बांदल यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं.

Mangaldas Badal
Sharad Pawar: शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का? मोदी बागेत बैठकींचं सत्र सुरु

कोण मंगलदास बांदल?

पुणे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या नावांच्या वारंवार चर्चा केल्या जातात. पैलवान म्हणूनही त्यांची ओळख आहे. मंगलदास बांदल हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. ५० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी त्यांना २०२० मध्ये निलंबित करण्यात आले होते.

शरद पवार गटाचे नेते आणि पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याच्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले पक्ष विलिनीकरणांच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. तर मंगलदास बांदल यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाशी काही संबध नाही. ते आमच्या गटाचे नेते नाहीत असंही प्रशांत जगताप यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Mangaldas Badal
Sharad Pawar Group Symbol: शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा दिला पर्याय; कोणते आहेत ते?

तर बांदल हे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, मी लोकसभेची निवडणूक लढवणारच आहे. याबाबत बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले, शिरूरमधून बांदल यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शुभेच्छा अशा शब्दांत त्यांनी बांदल यांना टोमणाही मारला आहे. आमच्याकडं चिन्ह अनेक आहेत पण पर्याय एकच आहे. लोकांपर्यंत जाण्यासाठी आमचा प्रयत्न आहे त्यासाठी मेळावे आणि बैठका घेतल्या जाणार आहेत, असं पुण्यातील पक्षाच्या बैठकीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

तर याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'मंगलदास बंदल यांच्यावर पक्षातील कशाची जबाबदारी आहे, हे मलाही माहित नाही. ते जयंत पाटील यांना विचारावे लागेल, मला काहीच माहिती नाही'.

Mangaldas Badal
Chandrakant Handore : काल बंडखोरीच्या चर्चा अन् आज दिलं राज्यसभेचं तिकीट! चंद्रकांत हांडोरेंचं काँग्रेसच्या यादीत नाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.