Manoj Jarange : मराठा समाजासाठी जमीन विकून आंदोलन उभारणारे मनोज जरांगे आहेत कोण? आता...

Manoj Jarange
Manoj Jarange
Updated on

मुंबई - मागील अनेक दिवसांपासून थंड झालेल्या मराठा आरक्षणच्या मागणीचा शुक्रवारी एकच भडका उडाला. त्याचं कारण ठरलं, जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेला बेछूट लाठीचार्ज. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या मराठा समाजाच्या तरुणांचे उपोषण मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात सुरू होते. मात्र या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघालं आहे. (Who is Manoj Jarange Patil )

Manoj Jarange
Maratha Reservation : उद्धव ठाकरेंच्या काळात अशा अनेक घटना घडल्या, मात्र...; गिरीश महाजन यांची टीका

कोण आहेत, मनोज जरांगे?

मराठा समाजाकडून जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील हे करत आहेत. मनोज हे मागील अनेक वर्षांपासून मराठा आंदोलन चळवळीत सक्रिय आहेत. सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या मनोज यांचे शिक्षण १२पर्यंत झालं आहे. हॉटेलमध्ये काम करत त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली.

मुळ गाव बीड

मनोज जरांगे यांचं मुळ गाव बीड जिल्ह्यातील मातोरी आहे. मात्र ते मागील काही वर्षांपासून अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे स्थायिक आहेत. मराठा समाजासाठी पूर्णवेळ काम करणारे अशी त्यांची ओळख आहे. पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील असे त्यांचे कुटुंब आहे.

Manoj Jarange
One Nation One Election : भारतातील 'वन नेशन वन इलेक्शन'ची प्रथा इंदिरा गांधींच्या काळात का थांबली ?

मराठा समाजासाठी विकली जमीन

मनोज जरांगे यांची आर्थिकस्थिती बेताचीच, मात्र त्यांनी मराठा समाजासाठी स्वत:ला झोकून दिलं आहे. त्यांच्याकडे चार एकर जमीन होती. त्यापैकी दोन एकर जमीन त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनासाठी विकल्याचं सांगण्यात येतं.

३० हून अधिक आंदोलन

मनोज जरांगे हे २०११ पासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी चळवळीत सक्रिय आहे. त्यांनी २०१४ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले होते. २०१५ ते २०२३ या आठ वर्षांच्या कालावधीत त्यांनी ३० हून अधिक आंदोलने केली.

शिवबा संघटनेचा विस्तार

मनोज जरांगे यांनी शिवबा संघटनेची स्थापना करून मराठा समाजासाठी अनेक आंदोलने केली. २०२१ मध्ये त्यांनी जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव येथे तब्बल ९० दिवस ठिय्या आंदोलन केलं होतं. शिवाय सहा दिवस उपोषणही केलं होतं. गोरीगंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली होती.

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना मारहाणीत होतं शिवबा संघटनेचं नाव

कोपर्डी येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपींना फाशी व्हावी यासाठी मनोज जरांगे यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. या प्रकरणातील आरोपींना मारहाण झाली होती, मारहाण करणाऱ्यांमध्ये जरांगे पाटील समर्थकांचे नाव आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.