Who is Milind Deora : चक्क अंबानी ज्याचा प्रचार करायचे असा भारतातील एकमेव राजकीय नेता, कोण आहेत मिलिंद देवरा?

काँग्रेसवर नाराज असलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांनी अखेर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच देवरा हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करू शकतात.
Who is Milind Deora Congress Leader who got mukesh ambani support eknath shinde shiv sena latest political update
Who is Milind Deora Congress Leader who got mukesh ambani support eknath shinde shiv sena latest political update
Updated on

काँग्रेसवर नाराज असलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांनी अखेर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच मिलिंद देवरा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करू शकतात. दरम्यान देवरा यांच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

का घेतला निर्णय?

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस इंडिया आघाडीचा भाग आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ही दक्षिण मुंबईची जागा काँग्रेससाठी सोडण्यास तयार नाही. अशा स्थितीत मिलिंद देवरा यांना दुसरी जागा शोधावी लागणार आहे, जी शोधणे काँग्रेसमध्ये अवघड आहे. मिलिंद देवरा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे आधी मानले जात होते, मात्र दक्षिण मुंबईची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाणार आहे. अशा परिस्थितीत मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Who is Milind Deora Congress Leader who got mukesh ambani support eknath shinde shiv sena latest political update
Milind Deora : 55 वर्षांचं नातं संपवलं! मिलिंद देवरांचा काँग्रेसला रामराम; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

मिलिंद देवरा कोण आहेत?

मिलिंद देवरा हे महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. मुरली देवरा केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. मुंबई दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसने नेहमीच विजय मिळवला आहे आणि देवरा कुटुंबाचा या लोकसभा मतदारसंघाशी अनेक वर्षांपासून संबंध आहे. इतकेच नाही तर उद्योगपती अंबानी त्यांचा प्रचार करायचे अशी देवरा यांची ओळख आहे. मागील 2019 च्या निवडणुकीत देखील रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी देवरा पाठिंबा दिला होता.

मिलिंद देवरा हे कधीकाळी राहुल गांधींच्या खूप जवळचे मानले जात होते. ते राहुल गांधींच्या कोअर कमिटीत देखील आहेत, म्हणजेच ते माजी काँग्रेस अध्यक्षांच्या जवळचे असलेल्या देवरा यांनी घेतलेल्या निर्णयामुले राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात देवरा कुटुंबाची वेगळी ओळख आहे. या कुटुंबातील एखादा तरी सदस्य गेली चार दशके दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. मिलिंद देवरा येथून दोन वेळा खासदार झाले आहेत, तर त्यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा हेही याच मतदारसंघातून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ही जागा देवरा घराण्याची पारंपारिक जागा आहे.

Who is Milind Deora Congress Leader who got mukesh ambani support eknath shinde shiv sena latest political update
मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! राजधानीतील महत्वाच्या निवडणुकीत हरला पक्ष, भारत समर्थक उमेदवार विजयी

देवरांना तिकीट का नाही मिळणार?

लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधीपक्षांच्या इंडिया आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. या आघाडीत उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना (यूबीटी) देखील सामील आहे. तसेच दक्षिण मुंबई मतदारसंघात सध्या खासदार उद्धव गटाते नेते अरविंद सावंत आहेत. अरविंद सावंत यांनी या जागेवर दोनदा विजय मिळवला आहे. अशा स्थितीत उद्धव यांना ही जागा काँग्रेसला द्यायची नाहीये. युतीमुळे मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून तिकीट मिळणार नाही, असे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.