राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची हव पाहायला मिळत आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यादरम्यान राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बदली करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात पोलिस कर्चाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या डीजीपी रश्मी शुक्ला यांनी केल्या होत्या मात्र आता रश्मी शुक्ला यांचीच बदली करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले असून या कारवाईमागे नेमकं कारण काय आहे आणि रश्मी शुक्ला या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत का आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.