Sachin Waze: शिवाजी पेठेचा विकेटकिपर असा बनला एनकाऊंटर स्पेशालिस्ट! कशी पडली सचिन वाझेंची विकेट?

Who is sachin waze?:विधानसभा निवडणुकीला दोन महिने शिल्लक राहिले असताना वाझे यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकारण तापणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आलेले सचिन वाझे कोण आहेत हे आपण जाणून घेऊया.
 sachin waze
sachin waze
Updated on

मुंबई- निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तीन वर्षांपूर्वी देखील ते चर्चेत आले होते. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानासमोर स्फोटके असलेली कार आढळून आली होती. याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. अटकेत असताना त्यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं होतं.

अँटिलिया, मनसुख हिरेन आणि १०० कोटींच्या आरोपाप्रकरणी सचिन वाझे सध्या तुरुंगात आहेत. त्यातच त्यांनी 'एएनआय'ला एक प्रतिक्रिया दिली. त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर थेट आरोप केले आहेत. यासंदर्भात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं असल्याचं देखील कळतंय. विधानसभा निवडणुकीला दोन महिने शिल्लक राहिले असताना वाझे यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकारण तापणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आलेले सचिन वाझे कोण आहेत हे आपण जाणून घेऊया.

 sachin waze
Sachin Waze: सचिन वाझेंचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप, फडणवीसांना पत्र लिहून दिली माहिती, जयंत पाटलांचेही नाव

कोण आहेत सचिन वाझे?

सचिन वाझे हे मुळचे कोल्हापूरचे आहेत. शिवाजी पेठेमध्ये त्यांचं घर आहे. सचिन वाझे यांना क्रिकेटमध्ये जास्त रस होता. तरुणपणी ते मराठा बोर्डिंगकडून क्रिकेट खेळायचे. ते विकेटकिपर होते. त्यांचा आवडता खेळाडू सुनील गावस्कर. शिवाजी विद्यापीठाचे मैदान किंवा जिमखाण्यावर त्यांनी क्रिकेटमध्ये मैदान गाजवलं आहे. सचिन वाझे हे धडपड्या स्वभावाचे असल्याचं त्यांचे मित्र सांगतात.

क्रिकेटर ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट असा त्यांचा प्रवास खूप रंजक आहे. १९९० मध्ये ते पोलीस दलात रुजू झाले. सुरुवातीला त्यांनी गडचिरोली येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांची पहिली बदली ठाण्यात १९९२ साली झाली अन् त्यानंतर त्यांचे नाव पोलीस दलात ओळखीचे झाले. दाव्यानुसार, ठाण्यात आल्यापासून त्यांनी आपल्या कुटुंबापासून आणि कोल्हापूरपासून पूर्ण संपर्क तोडला. आपल्या आईच्या अंत्यसंस्काराला देखील ते गेले नाहीत.

 sachin waze
Sachin Vaze: "फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला," सचिन वाझेच्या देशमुखांवरील आरोपांवर सुषमा अंधारेंचा हल्ला

मुन्ना नेपालीच्या एन्काउंटरमुळे सचिन वाझे मुंबई पोलीस दलात चर्चेत आल्याचं बोललं जातं. घाटकोपर स्फोटाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी २००२ मध्ये ख्वाजा युनूसला ताब्यात घेतले होते. ख्वाजा पोलीस कोठडीतून फरार झाल्याचा दावा करण्यात आला. पण, त्याचा कोठडीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी काही अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. वाझे यांचे याप्रकरणी निलंबन झाले होते.

आतापर्यंत किती केलेत एन्काऊंटर?

१९९० च्या दशकामध्ये अंडरवर्ल्डने मुंबईत डोकं वर काढण्यास सुरुवात केली होती. दाऊद, छोटा राजन, अरुण गवळी यांनी मुंबईत दहशत निर्माण केली होती. मुंबईत दिवसाढवळ्या रक्तपात सुरु झाला होता. त्यावेळी अंडरवर्डविरोधात पोलीस दलाने मोहीम सुरु केली.

१९९२ मध्ये वाझे मुंबईत आले होते. त्यांना मुंबईत क्राइम ब्रँचमध्ये पोस्टिंग मिळाली. वाझे यांचे गुरु होते एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा. त्यांच्या हाताखाली काम करताना वाझे यांची ओळख देखील एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून झाली. सचिन वाझे यांनी दाऊद इब्राहिम, छोटा राजन, मुन्ना नेपाळी अशा अनेक गँगस्टरच्या गँगमधील सदस्यांचा एन्काऊंटर केला आहे. त्यांनी आतापर्यंत ६३ जणांचा एन्काऊंटर केल्याचं सांगितलं जातं

 sachin waze
Sachin waze: जयंत पाटील अडकणार? सचिन वाझेंनी नाव घेतल्यामुळे नवा ट्विस्ट; फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात काय?

राजकीय मैदानात!

निलंबित असतानाच वाझे यांनी २००७ मध्ये पोलीस दलातून राजीनामा दिला अन् राजकीय पारी सुरु केली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राजकारण हा त्यांचा पिंड नव्हता. त्यामुळे यात ते जास्त काळ रमले नाहीत. त्यांनी एक व्यवसाय सुरु केला. त्यांनी चीनमधील काही कंपन्यांशी करार केला अन् इम्पोर्ट-एक्सपोर्टच्या व्यवसायात नशीब आजमावण्यास सुरुवात केली.

नशीबाने घेतला वेगळा टर्न

आयुष्यात कधी-काय घडेल हे सांगता येत नाही. तसंच सचिन वाझे यांच्यासोबत झालं. राज्यात २०२० मध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. सचिन वाझे यांना १३ वर्षानंतर पुन्हा पोलीस दलात घेण्यात आलं अन् त्यांना क्राइम इंटेलिजन्स युनिटचे प्रभारी प्रमुख करण्यात आलं. पदभार स्विकारताच सचिन वाझे यांनी कारवाईचा धडाका लावला.

सचिन वाझे हे उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जायचे. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. तसेच, अर्णव गोस्वामी यांच्या कथित टीआरपी घोटाळ्याबाबताच्या प्रकरणात वाझेच चौकशी करत होते. 'अँटिलिया' प्रकरणात त्यांना अटक झाली तेव्हापासून ते केंद्रीय तपास यंत्रणाच्या ताब्यात आहेत.

एक पुस्तकही लिहिलंय

सचिन वाई यांनी २६/११ च्या हल्ल्यावर आधारित 'जिंकून हरलेली लढाई' हे पुस्तक लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.