Sanjay Raut : क्राईम रिपोर्टर, शिवसेना खासदार ते ED च्या जाळ्यात

शिवसेना म्हटलं की उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आपसूकच डोळ्यांसमोर येणारा चेहरा म्हणजे संजय राऊत.
Sanjay Raut News
Sanjay Raut Newsesakal
Updated on
Summary

शिवसेना म्हटलं की उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आपसूकच डोळ्यांसमोर येणारा चेहरा म्हणजे संजय राऊत.

Sanjay Raut News : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळून भाजप-शिंदे गटाचं सरकार आलं. या घडामोडीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळं सध्या शिवसेना (Shiv Sena) अडचणीत आहे. मात्र, वेळोवेळी शिवसेनेला सावरण्याचं काम संजय राऊत यांनी केलंय.

अलीकडच्या काळात शिवसेना म्हटलं की उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आपसूकच डोळ्यांसमोर येणारा चेहरा म्हणजे संजय राऊत. 2019 च्या सत्तानाट्यापासून संजय राऊत यांचा (Sanjay Raut) शब्द म्हणजेच शिवसेनेची भूमिका असं जणूकाही समीकरणच तयार झालं आहे. राज्यसभेत खासदार असलेल्या संजय राऊत यांनी गेल्या अडीच वर्षांत सर्वांनाच नव्यानं आपली दखल घ्यायला भाग पाडलंय.

महाराष्ट्रात 2019 मध्ये निवडणुका झाल्यानंतर तीन पक्षांचं सरकार स्थापन होईपर्यंत भाजपला एकहाती शिंगावर घेण्याचं काम संजय राऊत यांनी केलं होतं. एकनाथ शिंदेंच्या बंडांनंतरही संजय राऊत चर्चेत आहेत. शिवसेनेचे एक महत्त्वाचे नेते असलेले संजय राऊत यांचा क्राईम रिपोर्टर ते शिवसेना खासदार हा राजकीय प्रवास कसा होता, याचा घेतलेला हा आढावा.

Sanjay Raut News
खाणं आणि जन्माला घालणं ही कामं तर जनावरंही करतात : मोहन भागवत

2019 च्या सत्तानाट्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणणाऱ्या दोन नेत्यांपैकी एक म्हणजे संजय राऊत. या संपूर्ण काळात भाजपनं अनेकप्रकारे शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, संजय राऊत यांनी सातत्यानं पत्रकारपरिषदा घेत भाजपच्या ‘अरे’ला ‘कारे’नं प्रत्युत्तर देऊन प्रत्येक वार पलवटून लावला. तेव्हापासून राऊत यांनी शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची जागा काबीज केलीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेत असणाऱ्या इतर प्रमुख नेत्यांच्या तुलनेत संजय राऊत यांनी बराच पुढचा पल्ला गाठला आहे.

संजय राऊत कोण आहेत?

संजय राऊत यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1961 रोजी अलिबागमध्ये झाला. त्यांनी वडाळ्याच्या आंबेडकर महाविद्यालयातून बी. कॉमची पदवी घेतली. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले संजय राऊत हे शिवसेनेचे राज्यसभा खासदार आहेत. ते शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत.

Sanjay Raut News
2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा कट; 2 दहशतवाद्यांना अटक

पत्रकारितेपासून राऊतांच्या कारकिर्दीची सुरुवात

संजय राऊत यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही पत्रकारितेपासून झाली. सुरुवातीला ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पुरवठा विभागात काम करणारे संजय राऊत पुढं मार्केटिंग विभागात काम करू लागले. त्यानंतर राऊत ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहत होते. क्राईम रिपोर्टर म्हणूनही संजय राऊत यांनी स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय. 1989 ला सामना सुरू झाला तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते. त्यांच्यानंतर संजय राऊत 1993 ला कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले.

शिवसेनेत राऊतांना विशेष स्थान

बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून संजय राऊत शिवसेनेत आहेत. मात्र, अजूनही ते कालबाह्य किंवा बाजूला सारले गेलेले नाहीत. संजय राऊत यांनी आजपर्यंत थेट कोणती निवडणूक लढवली नसली तरी मातोश्रीच्या दरबारातील त्यांचं स्थान आजही कायम आहे. बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे अशा तिन्ही पिढ्यांसोबत जुळवून घ्यायचं कौशल्य संजय राऊत यांनी आत्मसात केलंय.

Sanjay Raut News
पिटबुल कुत्र्याचा 80 वर्षाच्या मालकिणीवर जीवघेणा हल्ला; तासभर तोडत होता शरीराचे लचके

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सौम्य भूमिका

2008 मध्ये एक प्रयत्न झाला होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून हा प्रयत्न करण्यात आला होता. शिवसेनेनं भाजपची साथ सोडायची आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसची साथ सोडून एकत्र यायचं, असा प्रयोग करता येईल का, याची चाचपणी त्यांनी केली. हा प्रयोग करण्यामागचा विचार संजय राऊत यांचाच होता. पण, त्या प्रयोगाचं पुढं काही होऊ शकलं नाही. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवारांसोबतची त्यांची मैत्री पुन्हा आधोरेखित झाली.

दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात टांगती तलवार असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना नऊ तासाच्या चौकशीनंतर अखेर आज ईडीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. राऊतांच्या घरी आज सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं होतं. तब्बल २५ ईडीच्या अधिकाऱ्यांकडून राऊतांची चौकशी करण्यात आली होती. काहीवेळा पूर्वी ईडीने राऊतांना ताब्यात घेतलं आहे. क्राईम रिपोर्टर, शिवसेना खासदार ते ED च्या जाळ्यात असा त्यांचा प्रवास झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()