मुख्यमंत्रीपदासाठी नारायण राणेंचं नाव सुचवणाऱ्या स्मिता ठाकरे कोण?

Smita Thackeray, Balasaheb Thackeray And Narayan Rane
Smita Thackeray, Balasaheb Thackeray And Narayan Rane
Updated on

मुंबई - राजकारणात कुणीही कायमचा शत्रु नसतो किंवा कायमचा मित्र नसतो, असं बोललं जातं. त्याची प्रचिती अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी अस्तित्वात आली तेव्हा महाराष्ट्राला आली. मात्र आश्चर्यकारकरित्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळल्यानंतर आणि अर्ध्याहून अधिक शिवसेना फुटल्यानंतर उद्धव यांच्याविरुद्ध आता अनेक नेते आपल्या मनातील खदखद बोलून दाखवत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच उद्धव यांना अत्यंत अविश्वासू संबोधलं होतं. त्यातच आज स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

Smita Thackeray, Balasaheb Thackeray And Narayan Rane
स्मिता ठाकरे पोहोचल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; चर्चांना उधाण

स्मिता ठाकरे यांचा विवाह बाळ ठाकरे यांचा दुसरा मुलगा जयदेव यांच्याशी झाला होता. स्मिता या जयदेव यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. जयदेव आणि स्मिता यांचा घटस्फोट झाल्यानंतर जयदेव यांनी मातोश्री सोडलं, पण स्मिता मात्र मातोश्रीवर राहात होत्या. स्मिता यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर स्मिता ठाकरे कोण? त्या राजकारणात येणार का? एकेकाळी शिवसेनेचे सत्ताकेंद्र ठरलेल्या स्मिता ठाकरे पुढं काय करणार, असे प्रश्न उपस्थित होत आहे.

स्मिता ठाकरे होत्या शिवसेनेचं सत्ताकेंद्र

त्याकाळी नारायण राणे शिवसेनेत तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होते. त्यांचा हा गुण बाळासाहेब ठाकरेंना खूप आवडला होता. ठाकरे कुटुंबीयांचा राणेंवर एवढा विश्वास होता की, बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. फेब्रुवारी 1999 मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये नारायण राणे मुख्यमंत्री झाले. स्मिता ठाकरे या एकेकाळी शिवसेनेचं सत्ताकेंद्र मानल्या जात होत्या. त्यांच्या सांगण्यावरूनच बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंना मुख्यमंत्री केले होते. मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर संपूर्ण ठाकरे कुटुंब दुखावले गेले होते.

Smita Thackeray, Balasaheb Thackeray And Narayan Rane
''शिवसेना सो़डल्यानंतर आई-वडिलांच्या पुण्याईमुळे वाचलो''

अनेक उद्योगपती किंवा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी स्मिता ठाकरे यांच्याशी संपर्क करायचे. एवढंच नाही तर, शिवसेनेच्या सत्ता काळात कोणत्याही विभागाची फाईल स्मिता ठाकरे मागवून घ्यायच्या, एवढा त्यांचा प्रशासनात दबदबा होता, असंही सांगण्यात येत. मात्र शिवसेनेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हे नाकारलं होतं.

पासपोर्ट ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय मुलीपासून जबरदस्त राजकीय वर्चस्व गाजवण्यापर्यंतचे स्मिता यांच्यातील जीवनातील बदल एखाद्या बॉलीवूडच्या स्क्रिप्टप्रमाणे होते. रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या स्मिता एक ब्युटी पार्लर देखील चालवत होत्या. या पार्लरमध्ये जयदेव यांच्या पहिल्या पत्नी जयश्री कालेकर वारंवार जायच्या. इथेच जयदेव आणि स्मिता यांची मैत्री झाली. त्यानंतर स्मिता यांचं येणे-जाणे वाढले. स्मिता आणि जयदेव यांच्यात जवळीक वाढलल्यानंतर जयदेव यांनी जयश्री यांना घटस्फोट देऊन स्मिता यांच्याशी लग्न केलं. मात्र कालांतराने दोघांमध्ये दुरावा आला.

Smita Thackeray, Balasaheb Thackeray And Narayan Rane
देव करो तुम्हाला पुढचं बोधचिन्ह 'खंजीर' मिळो; मुनगंटीवारांचे ठाकरेंना चिमटे

1995 मध्ये जयदेव यांच्यापासून दुरावल्यानंतर स्मिता यांचा शिवसेनेतील प्रभाव वाढला. 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्रात सेना-भाजपची सत्ता होती, तेव्हा स्मिता शक्तीशाली बनल्या होत्या. स्मिता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून एखाद्या विशिष्ट फाईलबद्दल सहज चौकशी करायच्या इथपर्यंत त्यांची पोहोच होते.

स्मिता ठाकरे बॉलीवूडपासून ते पेज थ्री पार्ट्यामध्ये अनेकदा पाहायला मिळतात. स्मिता यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्या सलमान खानपासून अमिताभ बच्चनपर्यंतच्या पार्ट्यांमध्ये दिसतात. त्यांनी अनेक बॉलिवूड शोमध्येही भाग घेतला आहे.

मागील काही वर्षांत स्मिता यांचा शिवसेनेशी फारसा संबंधही दिसून आला नाही. मात्र आज त्यांनी शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना आपले जुने कार्यकर्ते म्हणून संबोधलं. त्यामुळे स्मिता पुन्हा शिंदे गटात सक्रिय होतील का, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.