Sharad Pawar Resignation : पवारांच्या मागची मुलगी कोण? पहाटेच्या शपथविधीवेळी केलं होतं महत्त्वाचं काम

आज अखेर पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी आपण पुन्हा एकदा अध्यक्षपदावर येत असल्याचं जाहीर केलं. यावेळी पवारांच्या मागे राष्ट्रवादीचे तरुण चेहरे दिसत होते.
Sharad Pawar Resigns
Sharad Pawar ResignsSakal
Updated on

राज्यात अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी आजही चर्चिला जातो. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांना परत आणण्याचं श्रेय ज्या व्यक्तीला जातं, ती व्यक्ती म्हणजे सोनिया दुहान. सोनिया पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत, याचं कारण म्हणजे आज झालेली शरद पवारांची पत्रकार परिषद.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीनामा देण्याची घोषणा केली, त्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांना राजीनामा मागे घेण्याची मागणी विनंती केली. त्यासाठी मोठा गदारोळही झाला. पण आज अखेर पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी आपण पुन्हा एकदा अध्यक्षपदावर येत असल्याचं जाहीर केलं. यावेळी पवारांच्या मागे राष्ट्रवादीचे तरुण चेहरे दिसत होते.

यामध्ये एका चेहऱ्याने लक्ष वेधून घेतलं. हा चेहरा म्हणजे सोनिया दुहान.

कोण आहेत सोनिया दुहान?

सोनिया दुहान या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्याही आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत त्या शरद पवारांच्या मागे बसल्या होत्या. त्यामुळे त्यांची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांना परत आणण्याचं श्रेय सोनियांना जातं!

अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार गायब होते. हे आमदार म्हणजे - दौलत दरोडा, नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि अनिल पाटील. नाट्यमय पद्धतीने भाजपाच्या गळाला लागलेल्या या आमदारांना परत आणण्याचं काम या २८ वर्षीय तरुणीने केल्याचं म्हटलं जातं. गुरुग्राममधल्या एका हॉटेलमधून सोनियांनी या आमदारांना परत आणलं होतं.

या आमदारांना कसं परत आणलं?

शरद पवारांना या चारपैकी एका आमदाराचा मेसेज आला. त्यांना दिल्लीतल्या कोणत्यातरी हॉटेलमध्ये कोंडून ठेवल्याचं या आमदाराने सांगितलं. त्यानंतर सोनिया आणि त्यांचा सहकारी धीरज शर्मा यांनी या आमदारांचं लोकेशन शोधलं. गुरुग्राममधल्या ओबेरॉय हॉटेलमध्ये हे आमदार असल्याचं त्यांना कळलं..

या हॉटेलमध्ये जेव्हा सोनिया आणि धीरज गेले, तेव्हा तिथे भाजपाचे १०० ते १५० कार्यकर्ते उपस्थित होते. ते सर्व परिस्थिीवर लक्ष ठेवून होते. त्यानंतर हॉटेलच्या मागच्या दाराने, जिथे कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, अशा ठिकाणाहून या आमदारांना बाहेर काढण्यात आलं. आणि या आमदारांना शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आणण्यात आलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()