Devendra Fadnavis: जरांगेंना घरात येऊन भेटणार नेते कोण? देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणाकडे?

Devendra Fadanvis on Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या मागे कोण आहे. त्यांनी कोणासोबत बैठका घेतल्या. जरांगेंना घरात येऊन भेटणार नेते कोण आहेत. त्यांना पैसे कोण पुरवते. हे हळुहळू समोर येतं आहे, असंही फडणवीस म्हणालेत.
Devendra Fadanvis on Manoj Jarange
Devendra Fadanvis on Manoj JarangeEsakal
Updated on

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी आक्रमक होऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवी टीका केली होती. तसेच महाराष्ट्राला बेचिराख करण्याच्या भाषेवरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारच्या बाजूचे आमदार आक्रमक झाले. यावेळी जरांगेंच्या विधानांमागं कोण आहे? याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली.

तर आमचीही हीच मागणी आहे, असं प्रत्युत्तर विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. दरम्यान विधानसभेत बोलताना या आंदोलनाच्या मागे कोण आहे आणि जरांगे यांचा बोलवता धनी कोण आहे हे पाहणं गरजेचं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadanvis on Manoj Jarange
Maharashtra Budget 2024: जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करा; विधानसभा अध्यक्षांचे आदेश

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, 'मी मराठा समाजासाठी काय केलं हे महाराष्ट्राला माहिती आहे. मी याआधी आरक्षण दिलं, ते सर्वोच्च न्यायालयात टिकवण्याचा प्रयत्न केला. त्या काळात अनेक योजना सुरू केल्या. मी मराठा समाजाच्या बाबतीत काय केलं याचं सर्टिफिकेट कोणी देण्याची गरज नाही. जरांगे यांनी माझ्यावर आरोप केले, त्यानंतर मराठा समाज माझ्यासोबत उभा राहिला. मनोज जरांगे यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे', असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis on Manoj Jarange
Traffic Police on Broken Number Plate: अनाधिकृत नंबरप्लेट लावणाऱ्यांवर कारवाईचा दंडूका; पाच लाखांचा ठोठावला दंड

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या मागे कोण आहे. त्यांनी कोणासोबत बैठका घेतल्या. जरांगेंना घरात येऊन भेटणार नेते कोण आहेत. त्यांना पैसे कोण पुरवते. हे हळुहळू समोर येतं आहे, असंही फडणवीस म्हणालेत.

मला जरांगे पाटील यांच्यासोबत काही देणं घेणं नाही, त्यांनी जी स्क्रीप्ट वाचली, ती रोज काहीजण बोलतात. तीच आज जरांगेंनी वाचली. आमच्याकडे सर्व माहिती आहे. सगळी चौकशी करून हे षंडयत्र बाहेर काढली जाईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Devendra Fadanvis on Manoj Jarange
Maharashtra Budget Session 2024: कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन विरोधक आक्रमक; गोळीबार अन् गुंडगिरीविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.