Sunil Tatkare: महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांनी खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? यावर शिक्कामोर्तब केले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्याचे मत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी कुणाची? यावर निवडणूक आयोगात आज युक्तिवाद होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना खा. तटकरे म्हणाले, ‘‘ गेल्या सव्वा वर्षांपासून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची यावर चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोगापुढे हा प्रश्न आता विचारासाठी आला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेन.
परंतु संसदीय लोकशाहीत लोकांचा कौल हा महत्त्वाचा असतो. काही दिवसांपूर्वी राज्यातील २५०० वर ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या यात देशातील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपने प्रथम स्थान पटकावले आहे. त्या खालोखाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे यावरूनच अजित पवार यांचे नेतृत्व सर्वांनी स्वीकारले असल्याचे स्पष्ट झाले.’’
सुप्रिया सुळेंशी वाद संपला
खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्या लोकसभेतील अनुपस्थितीबद्दल अनेकदा प्रश्न विचारले. ‘‘ महिला आरक्षणाचे विधेयक लोकसभेत मांडले तेव्हा मी सभागृहात होतो. परंतु गणेश चतुर्थीसाठी आपण दुसऱ्या दिवशी गावाला गेलो.
यामुळे आपण या विधेयकाबद्दल गंभीर नाही, असा अर्थ होत नाही, त्याचे उत्तर आपण दिलेले आहे. परंतु वारंवार हाच प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. आता माझ्यासाठी हा विषय संपला आहे,’’ असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.