Vitthal Temple Badve: विठ्ठलाचे बडवे नेमके कोण? असा आहे बडव्यांचा इतिहास

वर्षभर महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.
God Vitthal
God Vitthal Sakal
Updated on

महाराष्ट्रात वर्षभर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मागच्या वर्षीचे विधान असो किंवा या वर्षी मंत्री छगन भुजबळ वा जयंत पाटील यांचे विधान असो; ‘ बडवे विठ्ठलाच्या दर्शनात मधे आले’ असा आशय त्यातून व्यक्त होतो.

सातत्याने या विधानांमध्ये येणारे ‘बडवे’ नेमके आहेत तरी कोण? त्यांचा इतिहास नक्की काय आहे? आणि बडव्यांच्या नकारात्मक अर्थाने उल्लेख का केला जातो? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

बडवे म्हणजे काय?

हे घराण्याचे नाव आहे. राजपूतांमध्ये देखील ‘बडवे’ घराणी आढळतात. ‘बडवे’ म्हणजे मोठे किंवा अधिक मान असणारे, सन्माननीय. अभंगांमध्येही बडवे या नावाचा उल्लेख आला आहे. काहींच्या मते, ‘बडवा’ हा शब्द ‘बरवा’ शब्दापासून आला असण्याची शक्यता आहे.

God Vitthal
Solapur News : स्मार्ट सिटीत विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संघर्ष; १२ शाळांच्या इमारती बनल्या अतिधोकादायक

हे बडवे कोण असतात ?

बडवे हे घराणे पंढरपूरचे आहे. म्हणजेच बडवे विठ्ठलाचे पुजारी. विठोबाची परंपरेने सेवा करणारे बडवे हे एक घर होते. त्यांचे आडनाव हे बडवे. हे घराणे कमीत कमी एक हजार वर्षांपासून म्हणजे ज्ञानेश्वरमाऊलींच्या आधीपासून पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करत असल्याचे पुरावे देखील सापडतात.

याच घराण्याकडे पांडुरंगाच्या पूजेचा मान होता. प्रल्हाद महाराज बडवे यांच्यासारखे महंतदेखील या घराण्यात झाले आहेत. जेव्हा पंढरपूर शहरावर नैसर्गिक संकट आले, हल्ले झाले, तेव्हा बडवे यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे संरक्षण केले. बडवे हे पंढरपूरच्या मंदिरातील पूजेसह पंढरपूरच्या मंदिराचे नित्योपचार करणे, व्यवस्थापन बघणे, अशी कामे करीत

या घराण्याने मंदिराचे व्यवस्थापन बघत असताना हळूहळू विठ्ठल मंदिरावर मक्तेदारी दर्शवण्यास सुरुवात केली, असे देखील म्हटले जाते. वारकऱ्यांना त्रास द्यायला त्यांनी सुरुवात केली. बडव्यांकडून संत चोखामेळासारख्या संतांनीदेखील त्यांच्या अभंगातून त्रास होत असल्याबद्दल विठ्ठलाकडे नाराजी व्यक्त केली आहे.

धांव घाली विठू आतां चालूं नको मंद ।
बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध ।।
संत चोखामेळांनी अभंगात असे लिहिल्याचे आढळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.