Devendra Fadanvis: आगामी निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीची जागा कोण लढवणार? फडणवीसांनी दिला पूर्णविराम; म्हणाले, “ती जागा…!”

कल्याण-डोंबिवली लोकसभेची जागा कोणाची या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पडदा टाकला
Devendra Fadanvis
Devendra FadanvisEsakal
Updated on

भाजप-शिवसेना युतीला एक वर्ष पूर्ण झालं आता या दोघांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या काही जागेवरून संबंध ताणले गेले आहेत, त्यातील महत्वाची जागा म्हणजे कल्याण-डोंबिवली लोकसभेची जागा यावरून काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जागेसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.(Latest Marathi News)

ठाण्यातील भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिनिधीत्व करत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावरच दावा ठोकला होता. यामुळे श्रीकांत शिंदेंही आक्रमक झाले होते. ही जागा कुणाची यावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी भाजपची भूमिका मांडली आहे.(Latest Marathi News)

Devendra Fadanvis
MNS: '...हे बाळासाहेबांना कदापि पटलं नसतं', भाजप-सेना काय भूमिका घेणार? INDvsPAK सामन्यावरुन मनसेचा सवाल

कल्याण-डोंबिवली लोकसभेची जागा नेमकी कुणाकडे? याबाबत वाद निर्माण झाला होता. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पडदा टाकला आहे. कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून सध्या श्रीकांत शिंदे खासदार आहेत. तर कल्याणमधील स्थानिक भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला होता.(Latest Marathi News)

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis: "देवेंद्र फडणवीस झोपेत बडबडत आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही"

श्रीकांत शिंदे यांनी या जागेसंबधीचा वाद मिटवण्यासाठी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांनी पडदा टाकला. “कल्याण-डोंबिवलीची जागा आत्ता शिवसेनेकडे आहे. ती जागा शिवसेनाच लढवेल”, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे आता या जागेवरून निर्माण झालेला वाद मिटण्याची शक्यता आहे.(Latest Marathi News)

Devendra Fadanvis
Ashadhi Ekadashi: विठुरायाच्या दर्शन रांगेत गोंधळ; शासकीय महापूजेनंतरही दर्शनाची रांग वेगाने पुढे सरकत नसल्यामुळे भाविक आक्रमक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.