Devendra Fadnavis LetterBomb: देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांसंबंधित 'तो' लेटरबॉम्ब का टाकला? ही आहेत '3' कारणे

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी पत्र लिहलं सत्ता येते जाते परंतु मलिकांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे.
Devendra Fadnavis LetterBomb
Devendra Fadnavis LetterBombEsakal
Updated on

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (काल) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्याला कारण ठरली माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची सत्ताधारी बाकावरील उपस्थिती. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करताना तुम्ही देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाहीत, असा घणाघात केला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाहीत, असे सांगितले.

दुसरीकडे मलिकांच्या एंट्रीमुळे महायुतीतच वाद सुरू झाले आहेत, फडणवीस यांनी काल थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले, मलिकांवर आरोप असताना त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

फडणवीस यांच्या या भूमिकेचे शिंदे गटानेही समर्थन केले आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मलिकांच्या सत्ताधारी बाकांवरील उपस्थितीवरून थेट राज्य सरकारवर निशाणा साधला, या व्यक्तीने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार केले आहेत, असे सांगण्यात आले होते, त्यामुळे सरकारची भूमिका काय आहे? असा सवाल दानवे यांनी केला.

Devendra Fadnavis LetterBomb
Nawab Malik : मुख्यमंत्री देखील नाराज? फडणवीसांच्या लेटर बॉम्बनंतर महायुतीमध्ये अजित पवार पडले एकटे

"ज्यांच्यावर आपण आरोपांच्या फैरी झाडल्या, दाऊदशी व्यवहार केल्याचे सांगत जेलमध्ये पाठविले. आज तेच आपल्याला इतके प्रिय कसे झाले? ते 'नवाबी थाटात' मांडीला मांडी लावून बसताना तुम्हाला 'आपले' वाटायला लागले आहेत. तुमच्या बाजूने बसले म्हणून ते आता 'ओके' आहेत की ही तुमच्या भाजप वॉशिंग मशिनची कमाल आहे?" असा सवाल दानवे यांनी केला, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.

"आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाहीत. मी आणि मुख्यमंत्री जवळ बसलो आहोत. आमच्या बाजूला अजितदादा बसले आहेत. त्यांच्या बाजूला भुजबळ बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते तुरुंगामध्ये होते पण तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढले नाही? याचे उत्तर द्या आणि मग आम्हाला प्रश्न विचारा," असे फडणवीस म्हणाले.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी पत्र लिहलं सत्ता येते जाते परंतु मलिकांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे.

Devendra Fadnavis LetterBomb
Ajit Pawar: मलिक आता कुठे बसणार? फडणवीसांनी लिहलेल्या 'त्या' पत्रावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

फडणवीसांनी नवाब मलिकांसंबंधित तो लेटरबॉम्ब का टाकला? ही आहेत कारणे

१) आर्यन खान, ड्रग्ज, जावई समीर खान आणि समीर वानखेडे प्रकरण

अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सर्व आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी फेटाळले होते. त्याचबरोबर, ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयावर केलेल्या आरोपांवरूनही फडणवीसांना घेरलं होतं.

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक झाली होती. न्यायालयीन लढाईनंतर आठ महिन्यांनी त्यांची सुटका झाली. समीर खान यांना समीर वानखेडे यांनी खोट्या प्रकरणात अडकवले होते व त्यामागे भाजप असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.

Devendra Fadnavis LetterBomb
Ajit Pawar : फडणवीसांच्या 'लेटर बॉम्ब'नंतर अजित पवार गट दोन पावलं मागे; तटकरे म्हणाले, आम्ही फक्त...

२) अमृता फडणवीसांविरोधात ट्विट अन् फडणवीसांशी वैयक्तिक वाद

१० नोव्हेंबर, २०२१ ला नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यात त्यांनी फडणवीसांचे मुन्ना यादव, रियाज भाटी यांच्याशी संबंध आहे असं म्हटलं होतं. फडणवीस आणि त्यांच्या पत्नीचे ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा दावाही मलिक यांनी केला होता.

त्यांच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीसांनी मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरातून गांजा जप्त करण्यात आल्याचा आरोप केला होता. प्रत्यक्षात पंचनाम्यात व आरोपपत्रात असं काहीच नाही. असं असतानाही फडणवीस यांनी आरोप केल्यामुळे मलिक यांची मुलगी निलोफर मलिक हीने फडणवीस यांना कायदेशीर नोटीस बजावली होती.

Devendra Fadnavis LetterBomb
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या 'लेटर बॉम्ब'नंतर शिंदे गटाला गुदगुल्या; संजय शिरसाट म्हणाले...

३) गोवावाला कंपाऊंडिंग प्रकरण- आर्थिक गैरव्यवहार

गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँडरिंगप्रकरणी नवाब मलिकांना ईडीने 23 फेब्रुवारी 2022 ला अटक केली होती. कुर्ला येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर नबाव मलिक यांच्याशी संबंधित कंपनीने कोट्यवधी रुपयांचा भूखंड कमी किमतीत विकत घेतला. ज्यांच्याकडून भूखंड खरेदी करण्यात आला त्यापैकी एक व्यक्ती मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित तर दुसरी व्यक्ती संघटित गुन्हेगार होती.

यांच्यातील एक कुख्यात गुंड दाऊदची बहिण हसीना पारकर हिचा अंगरक्षक होता. हा भूखंड बॉम्बस्फोट तसेच संघटित गुन्हेगाराशी संबंधित असल्यामुळे तो सरकारदरबारी जमा होणे आवश्यक होते. परंतु तो विकत घेऊन नबाव मलिक यांनी गुन्हेगारांचा भूखंड वाचवला, असा आरोप तेव्हा विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. काळा पैसा प्रतिबंधक कायदा १ जुलै २००५ पासून अमलात आला आणि हे प्रकरण त्याआधीचे असल्यामुळे या कायद्याअंतर्गत आपल्यावर कारवाई होऊ शकत नाही, असे मलिक यांचे म्हणणे होते.

नवाब मलिक यांच्यावर काय आरोप आहेत?

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित सलीम पटेल आणि हसीना पारकर यांच्या गोवावाला कंपाउंड जमीन व्यवहारात अपहार केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.