Sharad Pawar
Sharad Pawaresakal

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Sharad Pawar: २००४ मधील ही राजकीय घटना अजित पवार नेहमी बोलून दाखवतात. ते आजही त्या घटनेवर नाराज आहेत. इंदापूर येथील सभेत देखील त्यांनी याबाबत वक्तव्य केले होते.
Published on

Sharad Pawar:

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2004 मध्ये जेव्हा राज्यात सरकार स्थापन केले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला होता, असे अनेक वेळा बोलून दाखवले आहे. तेव्हा मला वेगळे व्हायला पाहिजे होते, असे देखील त्यांनी म्हटले आहे.  २००४ मध्ये सर्वाधिक आमदार असूनही शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाची संधी सोडली.

२००४ मधील ही राजकीय घटना अजित पवार नेहमी बोलून दाखवतात. ते आजही त्या घटनेवर नाराज आहेत. इंदापूर येथील सभेत देखील त्यांनी याबाबत वक्तव्य केले होते.

२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे युती सरकार स्थापन झाले होते. यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती. दरम्यान लोकसत्ता ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी २००४ मधी गणित सांगितलं आहे.

शरद पवार म्हणाले, २००४ मध्ये फार विचारपूर्वक निर्णय घेतला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रश्नच नव्हता. कारण ते फार नवखे होते. मुख्यमंत्री पदासाठी कोणीही नवखा नेता आमच्याकडे नव्हता. छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर भविष्याच पक्षात फुट पडली असती. त्यामुळे अधिकचे मंत्रि‍पदे आणि खाती घेऊन काँग्रेसकडे मुख्यमंत्री पद कायम ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला.

Sharad Pawar
Loksabha Election : अमेठी, रायबरेलीकडे मोदींची पाठ;अमित शहांचे रोड शो आणि सभा,उद्याच्या मतदानाकडे लक्ष

प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत देखील शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. २००४ पासून प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यास आग्रही होते. भाजपने इंडिया शायनिंगचा प्रचार सुरु केला, तेव्हा ते भाजपमध्ये जाण्यास आग्रही होते. अटल बिहारी वाजेपेयी यांच्याविषयी आदर असला तरी मते मिळणार, असं मी त्यांना सांगत होतो, असे शरद पवार म्हणाले.

शेवटी मी प्रफुल्ल पटेल यांना म्हटलं तुम्हाल हव तर तु्ही भाजपबरोबर जा, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, असे शरद पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून पैशांचा पाऊस... आतापर्यंत 9 हजार कोटींची रोकड जप्त! गुजरात पहिल्या नंबरवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.