Abdul Sattar: ...म्हणून अब्दुल सत्तार अयोध्येला गेले नाहीत, कारणं आलं समोर

अब्दुल सत्तार अयोध्येला का गेले नाहीत? नाराजाच्या चर्चांवर सत्तारांनी स्पष्टच सांगितलं
abdul sattar
abdul sattar esakal
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या अयोध्या दौऱ्यावर गेले होते. शिंदेंच्या या दौऱ्याची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील काही आमदार आणि खासदार गैरहजर असल्यामुळे ते समर्थक आमदार आणि खासदार नाराज आहेत का याची जोरदार चर्चा रंगली. विशेष म्हणजे 3 आमदार आणि एका खासदाराच्या नाराजीवरून नवे तर्क वितर्क लावले जात आहेत.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार शहाजी बापू पाटील, अपक्ष आमदार बच्चू कडू आणि खासदार भावना गवळी यांच्या अयोध्येतील गैरहजेरीवरून प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यावरून अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अब्दुल सत्तार म्हणाले की, मी नाराज नाही. इथे अवकाळी पाऊस सुरु असल्यामुळे शेतीच्या नुकसानीची पाहणी करत आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसणं हेही रामाचंच काम आहे, असं वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

abdul sattar
Supriya Sule: अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांमध्ये फूट? सुप्रिया सुळेंनी म्हणाल्या...

कृषीमंत्री अब्दुल सत्तार सध्या अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या भागांचा दौरा करत आहेत. या दौऱ्यावेळीच त्यांनी नाराजीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘रामाबद्दल माझ्या मनामध्ये एक तीळ मात्र शंका नाही. मी एक राम भक्तच आहे. काही ठिकाणी हे जे शेतकरी बांधवांवर संकट आलं आहे. पाहणीसाठी मी दौरा काढला आणि सातत्याने जालना संभाजीनगर त्यानंतर बीड, परभणीचा काही भागात मी गेलो. आज मी दोन ते तीन जिल्हे पाहणार आहे. अकोला, बुलढाणा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री आमच्याकडेही संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसणं हेही रामाचंच काम आहे. त्यासाठी मी अयोध्येला गेलो नाही, अशी प्रतिक्रिया सत्तार यांनी यावेळी दिली आहे.

abdul sattar
महापालिका निवडणुका कधी होणार? भाजप नेत्याने दिली मोठी अपडेट

या नेत्यांच्या गैरहजेरीवर संजय राऊत यांचा दावा काय?

अयोध्येला एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात काही जण गेले नव्हते. शिंदेंच्या आमदारांचा एक मोठा गट अस्वस्थ आहे, काहीतरी गडबड आहे, असं माझ्या कानावर आलं आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. तर सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी याबद्दल स्पष्टच लिहल आहे. काहीजण अयोध्येत न जाणं ही शिंदे गटातील बेदिलीची ठिणगी आहे. आगामी काळात चित्र स्पष्ट होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

abdul sattar
Shivsena News: मोठी बातमी! शिवसेना भवन, शाखा, पक्ष निधी शिंदेंच्या शिवसेनेला द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.