कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार त्यांच्या मतदारसंघामध्ये एमआयडीसी उभी रहावी यासाठी प्रंचड आग्रही आहेत. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात एमआयडीसीसाठी रोहित पवार यांनी आंदोलनही केलं होतं. भर पावसात ते आंदोलनाला बसले होते. MIDC साठी त्यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर चर्चा सुद्धा केली आहे. MIDC आल्यास मतदारसंघात रोजगार निर्मिती होईल, असा रोहित पवार यांना विश्वास आहे. म्हणून ते MIDC साठी आग्रही आहेत. तर यावरुन आमदार राम शिंदे यांच्या वाकयुद्ध रंगलं आहे.
तर आज रोहित पवार यांनी आज भाजप आमदार राम शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यावर राम शिंदे यांनी तिखट भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. राम शिंदे यांनी उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवारांची बारामतीत भेट घेतली होती. त्यावेळी गाडी रोहित पवार यांनी चालवली होती त्यावरुनही राम शिंदे यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले राम शिंदे?
'मिडीयासमोर या चर्चा करू या', रोहीत पवारांच्या या वक्तव्यावर राम शिंदे म्हणाले की, 'मिडीयासमोर चर्चा करायला काहीच अडचण नाही. टिव्हीवर डिबेट लावा. कुठे पाहिजे तिथे चर्चा करू. मी तीन मुद्दे सांगितले. नीरव मोदींनी माझ्या काळात जमीन खरेदी केली, तर केली. माझ्या काळात खरेदी केलेली जमीन तुम्ही हस्तगत केली. तुमचं काय कनेक्शन आहे. तुम्ही अदानीची गाडी चालवता, खुप उद्योग धंदे आणलेत मग त्यांची गाडी कर्जत-जामखेडकडे का वळवली नाही असा प्रश्न शिंदेंनी रोहित पवारांना केला आहे.
तर पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, 'तुम्ही दुनियात प्रसिध्दी मिळवली, अदाणी सुध्दा माझं ऐकतात असं, अदाणी फार मोठे आहेत, त्यांनी अनेक उद्योग आणले, ते तुमचं ऐकतात तर मग तुम्ही ती गाडी कर्जत-जामखेडकडे का वळवली नाही. MIDC तर होती तिथे असंही शिंदे पुढे म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.