सोलापूर : शितकाळात (हिवाळा) थंड हवा असते आणि त्यामुळे लवकर घाम येत नाही. या पार्श्वभूमीवर जास्तवेळ व्यायाम करता येतो. थंडीत पचनशक्ती चांगली असते आणि त्यामुळे भूक लागते व जेवणही भरपूर जाते. जास्त व्यायाम करण्यासाठी अंगात ताकद राहते. त्यामुळे हिवाळ्यात कपाळावर घाम व तोंडाने श्वास घेण्याची वेळ येईपर्यंत व्यायाम सोयीचा असतो. मॉर्निंग वॉक हा सर्वांसाठीच सोयीचा व्यायाम असून सध्या मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
हिवाळ्यात प्रथिने (सर्वच डाळी, गोड व तळलेले असे जड पदार्थ) जास्त असलेले पदार्थ खाणे शरीरासाठी चांगले असते. हिवाळ्यात पचनशक्ती वाढलेली असते व रात्रीची वेळ जास्त असल्याने झोपही छान होते. त्यामुळे जड पदार्थ खाल्ले तरी ते सहज पचतात. याकाळात भरपूर भूक लागते, भरपूर जेवण जाते. पण, नियमित व्यायामामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहातो व अकाली वार्धक्याची लक्षणे टाळता येतात. थंडीत फिरणे, चालणे (भरभर चालणे तेही गप्पा न मारता) असा साधा व्यायाम देखील करता येईल. दरम्यान, हिवाळ्यात घराजवळील मैदानात किंवा बागेत किमान एक तास तरी फेरफटका मारावा, जेणेकरून दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत होते. त्याबरोबरच योगासने व आठवड्यातून एकदा सांघिक खेळ खेळल्यास त्याचाही शरीराला चांगला फायदा होतो, असे अनेकांचे अनुभव आहेत.
हिवाळा व्यायामासाठी खूप उत्तम काळ
शाळांना क्रीडांगण नाही आणि घराला अंगण पण राहिलेले नाही, त्यामुळे लहान मुलांपासून अनेकांमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळते. दुसरीकडे नियमित व्यायाम, अवेळी जेवण, जागरण आणि असंतुलित आहार, यामुळे मधुमेहाची समस्या देखील वाढत आहे. त्यामुळे दररोज व्यायाम करणे शरीरासाठी खूप महत्त्वाचा असून हिवाळा त्यासाठी खूप उत्तम काळ आहे.
- डॉ. गायत्री देशपांडे, आयुर्वेद तज्ज्ञ, सोलापूर
‘ही’ चतु:सूत्री लक्षात ठेवावी
१) हिवाळ्यात शारीरिक कष्ट करण्याची ताकद वाढते; व्यायाम न केल्यास हिवाळ्यात लठ्ठपणा वाढतो. हिवाळ्यात आपल्या घराजवळच्या मैदानात किंवा बागेत किमान एक तास जरी फेरफटका मारल्याने दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत होते. त्याबरोबरच योगासने, आठवड्यातून एकदा सांघिक खेळ खेळा. काहीजण कायमचेच वर्षभर 'मॉर्निंग वॉक' करतात.
२) मॉर्निंग वॉक किंवा सायंकाळी चालायला जाताना कानात हेडफोन नको, रोडवरून चालताना हेडफोन धोक्याचा ठरू शकतो. त्यामुळे मोकळ्या मैदानात व्यायाम करावा, मन एकाग्र राहण्यासाठी एकटे व्यायाम करणे चांगला, गाणी ऐकत नको.
३) नव्याने व्यायाम करायला सुरवात करताना एकदमच खूप व्यायाम नको. एकदम खूप व्यायाम केल्यास आयुर्वेदात वातवर्धन (दुसरेच अवयवाचा त्रास होतो) होईल, असे सांगितले आहे. व्यायाम करताना हात-पायाचा रक्तप्रवाह वाढतो आणि त्याचा ताण हृदयावर येतो, त्यामुळे अतिव्यायाम टाळावा.
४) रात्रीच्या वेळी व्यायाम करणाऱ्यांनी त्यांच्या फिरण्याची व जेवणाची वेळ यात किमान चार तासाचे अंतर असावे हे लक्षात ठेवावे. जेवल्यानंतर रक्तप्रवाह पचनसंस्थेकडे जास्त लागतो, व्यायाम करताना स्नायूकडे लागतो, त्यामुळे विरोधाभास निर्माण होऊन शरीर बिघडते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.