Hanuman Jayanti : हनुमानाला बजरंगबली का म्हटलं जातं ?

यासोबतच सर्व मनोकामना पूर्ण होतात. आपण सर्व हनुमानाला हनुमान, पवनपुत्र, बजरंगबली आणि संकटमोचन इत्यादी अनेक नावांनी ओळखतो.
Hanuman Jayanti
Hanuman Jayantigoogle
Updated on

मुंबई : रामभक्त हनुमान यांच्याविषयी आपण अनेक कथा ऐकल्या आहेत. हनुमानाला कलियुगाचा देव म्हणूनही ओळखले जाते. हनुमानजींची पूजा केल्याने भक्तांचे सर्व दुःख नष्ट होते, असे मानले जाते.

यासोबतच सर्व मनोकामना पूर्ण होतात. आपण सर्व हनुमानाला हनुमान, पवनपुत्र, बजरंगबली आणि संकटमोचन इत्यादी अनेक नावांनी ओळखतो. पण रुद्रावतार हनुमानाला बजरंगबली हे नाव कसे पडले हे तुम्हाला माहीत आहे का ? हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत (why hanuman is called bajarangbali)

Hanuman Jayanti
Obesity Cancer : लठ्ठपणा ठरू शकतो कर्करोगाला कारणीभूत; व्यायामाचा आळस पडेल महागात

पौराणिक कथेनुसार

रामायणातील हनुमानाच्या उल्लेखानुसार, हनुमान हा माकडाचे तोंड असलेला अतिशय बलवान मनुष्य आहे. ज्याचा देह वजरासारखा आहे. तो त्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि हातात गदा धारण करतो.

या पृथ्वीतलावर अमरत्व मिळविलेल्या सात लोकांमध्ये कलियुगाचे आराध्य दैवत हनुमानाचे नावही समाविष्ट असल्याचा वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे.

महाबली हनुमानाला बजरंगबली म्हणण्यामागचा संदर्भ असा आहे की, एकदा हनुमानाने माता सीतेला सिंदूर लावताना पाहिले, तेव्हा त्याने तिला विचारले, तू सिंदूर का लावतेस ?

तर याला उत्तर देताना माता सीता म्हणाली की ती पती श्री राम यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी हे सिंदूर लावते. त्यांनी हनुमानाला सांगितले की, धर्मानुसार जी विवाहित स्त्री कपाळावर सिंदूर लावते, तिच्या पतीला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते.

Hanuman Jayanti
Mansplaining Meaning : फुकटचे सल्ले देणाऱ्या पुरुषांना वठणीवर कसं आणायचं ?

माता सीतेचे म्हणणे ऐकून बजरंगबलीने विचार केला की, जेव्हा प्रभू रामाला एवढा सिंदूर लावल्याने इतका फायदा होईल, तेव्हा संपूर्ण अंगावर सिंदूर लावल्याने प्रभू राम अमर होतील. म्हणूनच ते "जय श्री राम" चा जप करताना अंगभर सिंदूर लावतात.

जेव्हा श्रीराम हनुमानाला या अवस्थेत पाहिले तेव्हा त्याने माता सीतेबद्दल सर्व काही भगवान रामांना सांगितले. हे जाणून श्रीराम हनुमानजींच्या भक्तीवर खूप प्रसन्न झाले आणि त्यांना आशीर्वाद देतात की आजपासून तुम्ही बजरंगबली म्हणून ओळखले जाल

बजरंगबलीमध्ये बजरंग म्हणजे भगवा आणि बली म्हणजे शक्तिशाली, म्हणून त्यांना बजरंगबली म्हणून ओळखले जाते.

( सूचना - या लेखातील माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे. अधिकृत माहितीसाठी कृपया तज्ज्ञांशी संपर्क साधावा. )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.