...म्हणून मंत्रीमंडळ विस्तार होईना; अजित पवारांनी सांगितले कारण

उपमुख्यमंत्र्यांनी चार वेळा दिल्लीचा दौरा केला आहे. तरीही राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही
Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

एकनाथ शिंदे यांनी ३ जुनला मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात नवे सरकार स्थापन होऊन महिना झाला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चार वेळा दिल्लीचा दौरा केला आहे. तरीही राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी मंत्रीमंडळ विस्तार न होण्यामागचे कारण स्पष्ट करत मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. (why is the cabinet not expanded ajit pawar question to shinde fadnavis government)

Ajit Pawar
भाजप-शिंदे गट महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवणार

अजित पवार सध्या नागपुर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या सरकारकडे बहुमत आहे तर मग मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? दोघे म्हणतात आम्ही दोघे काम करतो आहे ना? मात्र हे शक्य नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार असेल तर कामं कधी होणार? या सरकारला एवढं मोठं बहुमत मिळाल आहे, त्यांनी ते विधानसभेत दाखविलंही आहे. तरीही मंत्रिमंडळ विस्ताराला इतका वेळ का लागतो आहे? असे अनेक प्रश्न अजित पवारांनी यावेळी उपस्थित केले.

Ajit Pawar
"संजय राऊत स्वप्न पाहतात, त्यांना स्वप्नातच राहू द्या"; मुख्यमंत्र्यांचा टोला

मी काही मुद्द्यांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलो. तेव्हाही त्यांना विचारलं की राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही. ते म्हणाले आम्ही करतो... मात्र ते विस्तार करतो असे म्हणत असले तरी ते होत नाही, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे... कदाचित त्यांना दिल्लीतून परवानगी मिळत नसावी, की इतर काही समस्या आहे, हे माहीत नाही असं म्हणत अजित पवारांनी या सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

Ajit Pawar
"मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी"

सत्ता बदल होता ना मोठ्या प्रमाणावर आश्वासन देण्यात आली, त्याची पूर्तता कठीण होत आहे. म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नाही का? असे ऐकले आहे, भाजपकडे 115 आमदार आहेत भाजप कार्यकारिणीमधील रोख लक्षात घेतला तर आमदारांनी त्यागाची भावना ठेवा असे सांगण्यात आले. तिकडे शिंदे गटातूनही कोण मंत्री होणार? कोण राज्यमंत्री होणार? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे विस्तार होत नसावे. असे अजित पवारांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.