गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. अशातच ठाकरे गटाकडून शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आल्याची चर्चा देखील रंगली आहे. दरम्यान, यासर्वावर पंकजा मुंडे यांनी मौन सोडले आहे. (Why not attend Fadnavis program Pankaja munde says)
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार प्रीतम मुंडे गेवराईत एकत्र आले होते.
यावेळी पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्या मनात कोणतीही खदखद नाही असे उत्तर देत नाराजीच्या चर्चेला मुंडेंनी पुर्णविराम दिला.
Maharashtra Government : राज्य सरकारचा महत्त्वाच निर्णय, न्यायालयीन लढ्यासाठी...
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
ठाकरे गटाच्या ऑफरबाबत विचारण्यात आले असता पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. यावर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी उत्तर दिलं आहे. अध्यक्षांच्या उत्तराला मी परत ओव्हरटेक करत नाही. माझ्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं हीच मोठी गोष्ट आहे. असं विधान पंकजा यांनी केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात त्या कार्यक्रमात पंकजा मुंडे दिसत नाहीत, अशी चर्चा आहे. त्यामागचं कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला असता मीही ती चर्चा ऐकली आहे. यावर वेगळी पत्रकार परिषद घेईन. असं त्यांनी उत्तर दिले.
माझ्या मनात कोणतीही खदखद नाही. त्यामुळे माझ्या मनात खदखद आहे अशा बातम्या लावण्याचं कारण नाही. मी भाजपच्या संस्कारात वाढलेली, मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळते. पण कुणाच्याही सार्वजनिक आणि पक्षाच्याबाहेरच्या कार्यक्रमाला जाणं मला कंपल्सरी नाही, असं त्या म्हणाल्या.
बावनकुळे काय म्हणाले?
आमचे मागच्या 22 वर्षापासून संबंध आहेत. त्यांच्या रक्तारक्तात भाजप आहे. या कपोलकल्पित बातम्या सोडून पंकजा यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्हं उभं करण्याचं काम काही लोक करत आहेत. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. आयुष्यात आणि स्वप्नातही भाजपला साईडला करावं किंवा आपण साईडला व्हावं असं त्यांच्या मनात येत नाही.
ग्रामविकास मंत्री असताना पंकजा यांनी मोठं काम केलं. त्या राष्ट्रीय सचिव म्हणून त्या काम करत आहेत. त्यांच्यावर मध्यप्रदेशची जबाबदारी आहे. त्यांचं नेतृत्व मोठं आहे. आज तरी त्यांच्यावर कोणताही अन्याय मला दिसत नाही.
Satyajeet Tambe : काँग्रेसमधील निलंबनानंतर सत्यजीत यांची प्रतिक्रिया; म्हणाले, एवढे वर्षे...
पण त्यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात मोठं वलंय आहे. त्यामुळे त्यांच्या पाठी आम्ही आहोत. त्यांना केंद्रीय पातळीवरील जबाबदारी आहे. आज आणि उद्याही भाजप त्यांच्या पाठी राहील. असही बावनकुळे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.