राऊतांच्या अटकेवर शरद पवार का बोलत नाहीत? शिरसाठांचा गौप्यस्फोट

संजय राऊतांना काल रात्री सक्तवसुली संचलनालयाने अटक केली आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSakal
Updated on

औरंगाबाद : संजय राऊत यांना काल सक्तवसुली संचलनालयाने रात्री उशीरा अटक केल्यानंतर शिवसेनेकडून भाजपला टीकेचे धनी बनवले जात आहे. दरम्यान या अटकेचे पडसाद राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनातही दिसून आले असून सभागृहातील गोंधळामुळे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर औरंगाबादचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी राऊतांच्या अटकेनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना धारेवर धरले आहे.

(MLA Sanjay Shirsath On Sharad Pawar)

संजय राऊतांवर जी कारवाई झाली त्यावर मागील काही दिवसांपासून काम चालू होते. या कारवाईसाठी राऊत तयार होते. त्यांनी याआधीही सांगितलं होतं की, "मी ईडीला घाबरत नाही, मला अटक करायची असेल तर करा. त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईला त्यांनी ज्या प्रकारे तोंड दिलेलं आहे त्याचं कौतुकच करावे लागेल परंतु अटक केली तरीही त्यांचं तोंड बंद झालेलं नाही ते महाराष्ट्रातील जनतेला आवडलेलं नाही." असं शिरसाठ म्हणाले.

Sanjay Raut
Sanjay Raut: राऊतांच्या अटकेचे पडसाद राज्यसभेत; दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब

शिवसेना फोडण्यासाठी पवारांनी राऊतांना सुपारी दिली - संजय शिरसाठ

राऊतांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबियांना भेटायला चालले आहेत पण याच उद्धव ठाकरे यांनी जर प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव यांच्यासाठी वेळ दिला असता तर शिवसेनेवर ही वेळ आली नसती आणि त्यांना जास्त आनंद झाला असता. संजय राऊतांनी शिवसेना फोडण्याचं काम केलं, तरीही त्यांना ईडीकडून अटक झाल्यावरही उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीला जातात असं शिरसाठ म्हणाले.

शरद पवारांनी राऊतांना शिवसेना फोडण्यासाठी सुपारी दिली होती. पण राऊतांच्या अटकेनंतर ते त्यांच्याविषयी काहीच प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत, तोंडातून शब्द काढत नाहीत कारण आता शिवसेना संपलेली आहे, त्यांचे काम संपलेले आहे, आता तुझी मला गरज नाही असं पवारांना वाटतं असा आरोप शिरसाठांनी केला. दरम्यान, संजय राऊतांवर ईडीने केलेली कारवाई ही कोणाच्याही सांगण्यावरून केली नसून त्यांच्यावरील कारवाई योग्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.