Nawab Malik : भाजपशासित राज्यात अशा कारवाया का होत नाहीत - अस्लम शेख

महाविकास आघाडी सरकार नवाब मलिकांच्या पाठिशी उभे
Aslam-Shaikh
Aslam-Shaikh
Updated on

मुंबई : नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपशासित राज्यांमधअये अशा प्रकारच्या कारवाया का होत नाहीत? असा सवाल त्यांनी केला आहे. अशा प्रकारच्या द्वेषाच्या कारवाईचं कुठलंही समर्थन होऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Why such actions do not take place in BJP ruled state Question by Aslam Shaikh)

Aslam-Shaikh
Nawab Malik | ८ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ED कडून अटक

शेख म्हणाले, अशा प्रकारची द्वेषाच्या कारवाईचं कुठलंही समर्थन होऊ शकत नाही. एखाद्यानं चूक केली असेल तर अशी कारवाई होण ठीक आहे. पण संपूर्ण महाविकास आघाडी नवाब मलिकांच्यासोबत आहे. पहाटे पाच वाजता ईडीकडून अशा प्रकारची कारवाई करणं हे खूपच चुकीचं आहे.

Aslam-Shaikh
पेपर फुटीचं प्रशिक्षण बिहारमध्ये; पुणे सायबर पथकाकडून तपास सुरु

महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांची नावं अशा कारवाईबाबत पुढे येत आहेत. इतरही राज्यात आपण पाहाल तर जिथं भाजपची राज्ये आहेत तिथ एकाही मंत्र्यावर अशा प्रकारची कारवाई झालेली नाही, असंही यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.