Loksabha 2024: सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार उमेदवार उभा करणार? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील थेट लढतीत हे असणार संभाव्य उमेदवार

लोकसभेच्या आगामी निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकांची तयारी पक्षांनी सुरू केली आहे.
Loksabha 2024
Loksabha 2024Esakal
Updated on

लोकसभेच्या आगामी निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकांची तयारी पक्षांनी सुरू केली आहे. अशातच शिरूर, सातारा, रायगड आणि बारामतीची जागा आपण लढवणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर सध्या बारामती, शिरूर आणि सातारा या जागा सध्या शरद पवार यांच्याकडे आहेत. तर रायगडमध्ये अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे हे खासदार आहेत.

तर इतर तीन जागी शरद पवार गटाचे खासदार आहेत. शिरूरमध्ये अमोल कोल्हे, सातारामध्ये श्रीनिवास पाटील तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे सध्या खासदार आहेत. या जागी आता अजित पवार देखील आपले उमेदवार उभे करणार आहेत, त्यामुळे या चार मतदारसंघात पवार विरूध्द पवार अशी लढत दिसून येण्याची शक्यता आहे.

Loksabha 2024
Ajit Pawar News : जयंत पाटलांनी तो शब्द पाळला असता तर.. ठाकरे सरकारच्या पडद्यामागच्या घडामोडींचा अजितदादांनी केला खुलासा

रायगडसह आता इतर ३ जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार कोण असतील हे पाहणंही महत्त्वाचं आहे. तर ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या जागा आहेत त्या आपण लढवूच पण, त्याचबरोबर ठाकरे गटाकडे ज्या जागा आहेत, त्यापैकी ज्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असेल तर तिथं भाजप आणि शिंदेंशी चर्चा करून आपल्याला जागा वाटप करता येईल" असं अजित पवार म्हणाले

अजित पवार कोणते उमेदवार देणार पाहणं महत्त्वाचं

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा बारामती मतदारसंघ येथे सुप्रिया सुळे निवडणूक लढवतात. मात्र, आता अजित पवार या ठिकाणी कोणता उमेदवार देणार याकडे राज्याचं लक्ष आहे. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार घरातील कोणत्या व्यक्तीला उमेदवारी देणार का? मुलगा पार्थ पवार की, पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणार का? किंवा कुटुंबातील कटूता टाळण्यासाठी अजित पवार बाहेरील उमेदवार म्हणून अजित पवार रूपाली चाकणकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे, पवार कुटुंब वारंवारं राजकारण आणि नातेसंबध वेगळे असल्याचे सांगत असले तरी आगामी लोकसभेत कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loksabha 2024
'शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत आम्ही महायुतीत सहभागी झालो, तर आमचं काय चुकलं?'

तर दुसरी जागा आहे साताऱ्याची, सातारा लोकसभा मतदारसंघ देखील गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादीकडे आहे. याठिकाणी शरद पवारांचे जवळचे मित्र श्रीनिवास पाटील खासदार आहेत. त्याच्याविरोधात अजित पवार गट नितीन लक्ष्मणराव पाटील यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. वाई खंडाळ्याचे आमदार मकरंद पाटील त्यांचे नितीन पाटील हे बंधू आहेत.

शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाकडे देण्यासाठी कोणताही प्रबळ उमेदवार नसल्यामुळे या जागी शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. कारण त्याठिकाणी दुसरा कोणताही प्रबळ दावेदार नसल्याने ही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Loksabha 2024
Ajit Pawar: बारामतीसह 4 लोकसभा लढवणार! अजित पवारांचा गौप्यस्फोट, उबाठाच्या'या' जागांवर NCPचा डोळा

रायगडमध्ये अजित पवार गटाचे खासदार आहेत. त्याठिकाणी सुनील तटकरे किंवा त्यांच्या परिवारातील कोणती व्यक्ती उमेदवार असू शकते. तर त्याठिकाणची जागा शरद पवार ठाकरे गटाला देऊ शकते. कारण त्याठिकाणी ठाकरे गटाकडे अनंत गीते हे प्रबळ दावेदार आहेत. तर ठाकरे गटाच्या कोणत्या जागांवर अजित पवार गट निवडणूक लढवणार ते पाहंणही औत्सुक्याचं असणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर ज्या मतदारसंघात आपला प्रबळ दावेदार नाही, त्या मतदारसंघात आपल्या मित्रपक्षाला उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.