Maharashtra Assembly Winter Session 2023: आव्हाड आणि अजित पवार एकाच कार्यालयात बसणार? नागपूर अधिवेनादरम्यान एकत्र लागले नेमप्लेट, हे आहे कारण..

अधिवेशनावेळी अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड एकाच कार्यालयात बसणार
Maharashtra Assembly Winter Session 2023
Maharashtra Assembly Winter Session 2023Esakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवारांसह इतर नेते सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. अशातच आजपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात होत आहे. यावेळी पक्ष कार्यालयावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड एकाच कार्यालयात बसणार आहेत. नागपूर विधानभवन परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांची नेमप्लेट लागली आहे.

काल कार्यालयावर अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांची नेमप्लेट लागल्याने शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली होती. आता राष्ट्रवादीच्या कार्यालयात दोन्ही गटाच्या नेत्यांची नेमप्लेट लागल्याचे दिसून येत आहे. आता ज्या नावांच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत, त्यानुसार जितेंद्र आव्हाड यांच्या शेजारी अजित पवार यांच्या नावाची पाटी आहे. दोन्ही नेते शेजारी शेजारी बसणार आहेत.

Maharashtra Assembly Winter Session 2023
Maharashtra Weather Update : राज्यात येत्या दोन दिवसात या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस झोडपणार; काळजी घेण्याचे आवाहन

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. काल देखील जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचा फोटो शेअर करत हल्लाबोल केला. त्यानंतर आता दोन्ही गटाचे नेते शेजारी शेजारी बसणार आहेत. विधीमंडळ परिसरात हे कार्यालय आहे. दोन्ही गटाने वेगळं कार्यालय मागितलेले नाही. त्यामुळे दोन्ही गटाला एकच कार्यालय देण्यात आलं आहे. फक्त नेमप्लेटवरून वाद होता.

Maharashtra Assembly Winter Session 2023
Maharashtra Winter Session 2023: हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता; मराठा आरक्षण, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार? याकडे राज्याचं लक्ष

महत्वाची बाब म्हणजे, अधिवेशनात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि शरद पवार गटाचे नेत्यांना एकच कार्यालय देण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र बसावं लागणार आहे. नागपूर विधानभवन परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जितेंद्र आव्हाड आणि अजित दादा यांची नेमप्लेट लागली आहे. अनिल पाटील यांची प्रतोद म्हणून नेमप्लेट लागली होती. पहिली केबिन अजित पवार यांची आहे, दुसरी प्रतोद अनिल पाटील यांची आहे. तिसरी केबिन जितेंद्र आव्हाड यांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.