Maratha Reservation : आता आरपारची लढाई! आरक्षण न मिळाल्यास मतदानावर टाकणार बहिष्कार; मराठा समाजाचा थेट इशारा

'कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ९ ऑगस्टला करणार धरणे आंदोलन'
Maratha Reservation Maratha Community
Maratha Reservation Maratha Communityesakal
Updated on
Summary

‘आरक्षण नाही तर मतदान नाही, हीच आमची भूमिका आहे. अनेक वर्षे आम्हाला फसवले गेले. आता आम्ही फसणार नाही.’

कोल्हापूर : येत्या २०२४ च्या निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षण (Maratha Reservation) न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाचे (Maratha Community) समन्वयक बाबा इंदूलकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ९ ऑगस्टला धरणे आंदोलन होत असून, जिल्ह्यातील मराठा खासदार व आमदारांसह अन्य नेत्यांनी त्यात सहभाग न नोंदवल्यास त्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Maratha Reservation Maratha Community
NCP Crisis : 15 ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप! राष्ट्रवादीचा मोठा गट अजितदादांसोबत जाणार? जयंत पाटलांचंही नाव चर्चेत

इंदूलकर म्हणाले, ‘शासनाने आमची फसवणूक केली आहे. आधी आम्ही अडाणी होतो, आता आमचे डोळे उघडले आहेत. न्यायिक पद्धतीने आम्ही मागणी करत आहोत. शासनाने त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी. मराठा समाजातील नेत्यांनी हा विषय समजून घेऊन मांडावा. अन्यथा त्यांच्याविरूद्धही आम्ही आंदोलन करू.’

भारती पोवार म्हणाल्या, ‘मराठा जातीतील नेत्यांनी अन्य समाजांचा विचार करून त्यांना न्याय दिला. आता मराठा समाजावर हलाखीची वेळ आली आहे. तरूण मराठा सैरभैर झाला असून, त्याला आरक्षणाची गरज आहे. हेतूपुरस्सर मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही.’

Maratha Reservation Maratha Community
Kolhapur : ..तर संपूर्ण मंडप खाली येवू शकतो, त्यामुळं हा धोका कोणालाही पत्करु देणार नाही; काय म्हणाले जिल्हाधिकारी?

रूपाराणी निकम म्हणाल्या, ‘कोल्हापुरात पडलेल्या आरक्षणाच्या ठिणगीचा महाराष्ट्रात (Maharashtra) वणवा पेटल्याखेरीज राहणार नाही. आरक्षण हिसकावून घेण्याची वेळ आली आहे. जे मराठा खासदार, आमदार आरक्षणाच्या लढ्यात येणार नाहीत, त्यांचा यापुढे विचार केला जाणार नाही.’ सुनीता पाटील म्हणाल्या, ‘आरक्षण नाही तर मतदान नाही, हीच आमची भूमिका आहे. अनेक वर्षे आम्हाला फसवले गेले. आता आम्ही फसणार नाही.’

Maratha Reservation Maratha Community
Shivaji University : परीक्षेत कॉपी करत असाल, तर वेळीच सावध व्हा! विद्यापीठानं 648 विद्यार्थ्यांवर केलीये मोठी कारवाई

अनिल घाटगे यांनी हा आंदोलनाचा पहिला टप्पा असल्याचे, तर किशोर घाटगे यांनी मराठा खासदार व आमदारांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करण्यात येईल, असे सांगितले. पत्रकार परिषदेस बाबा पार्टे, अनिल कदम, चंद्रकांत पाटील, पद्मावती पाटील, अविनाश दिंडे, पांडुरंग दिवसे, पूजा पाटील, सुधा सरनाईक, लता जगताप, माई वाडेकर, विद्या पोवार उपस्थित होते.

‘मराठा आरक्षणाविरोधात तिरोडकरने याचिका दाखल केली. त्यानंतर आम्हाला साताऱ्याला जायचे असताना शासनाने वाईच्या जंगलात नेऊ सोडले. आमचा आजार तीस-चाळीस वर्षांपूर्वीचा आहे. त्यासाठी आम्ही नवा डॉक्टर आणला आहे. त्याच्याकडचे औषध तरी पाहा, असे आमचे शासनाला म्हणणे आहे. आम्हाला तीस वर्षे छळण्यात आले आहे. आता आम्ही छळणार आहोत. न्यायिक पद्धतीने आम्ही मागणी करत असलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणारच’, असा विश्‍वास श्री. इंदूलकर यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()